Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली देशातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी 'मन की बात' हा रेडिओ शो सुरू केला होता. 29 जानेवारी रोजी, रविवारी या कार्यक्रमाचा 97 वा भाग प्रसारीत झाला. हा पंतप्रधानांचा मन की बातद्वारे केलेला 2023 वर्षातला पहिलाच संवाद होता. सुरुवातील मोदी यांनी आठवड्याला एक भाग करत होते, मात्र कामाच्या व्यापामुळे 15 दिवसांतून एकदा संवाद साधू लागले, त्यानंतर महिन्यातून एकदा संवाद साधतात. सध्याच्या व्यस्त वेळापत्रकात जमेल तेव्हा रेकॉर्डिंग करतात आणि मग तो रविवारी 11 वाजता आकाशवाणी, युट्यूब, टिव्ही आदी माध्यमातून प्रसारीत केला जातो. तसेच हा कार्यक्रम भारतातील 23 भाषांमध्ये प्रसारीत होतो. तर, येत्या एप्रिल महिन्यात पंतप्रधानांचा 100 वा मन की बातचा एपिसोड प्रसारीत होणार आहे, या एपिसोड खास असावा यासाठी माय गव्हरमेंटतर्फेत मन की बातच्या लोगो डिझाइनर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारने जनतेला एक लाख रुपये जिंकण्याची संधी दिली आहे. केंद्र सरकारने मन की बात कार्यक्रमासाठी लोगो तयार करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. जी व्यक्ती सर्वोत्तम लोगो डिझाईन करेल त्यांना सरकारकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्हाला स्पर्धेत सहभागी होण्याची एकच संधी आहे.
स्पर्धेचे नियम काय आहेत? (What are the contest rules?)
या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी तुम्हाला मन की बातला समर्पक, 100 व्या एपिसोडसाठी साजेसा, अर्थपूर्ण आणि आकर्षक लोगो तयार करावा लागेल. या स्पर्धेत विजयी होण्यासाठी केवळ आकर्षक लोगो नाही, तर स्पर्धेचे नियमही पाळावे लागणार आहेत. लोगो केवळ जेपीइ्जी (JPEG), जेपीजी (JPG), पीएनजी (PNG) आणि एसव्हीजी (SVG) याच फॉरमॅटमध्ये स्वीकारले जाणार आहेत. तर याच फॉरमॅटमधील फाईल अपलोड करावी लागेल. हा लोगो डिजीटल प्लॅटफॉर्मवरच डिझाईन केलेला असावा, तो रंगीत असावा. तर लोगोचा आकार पोर्ट्रेट किंवा लँडस्केपमध्ये 5 सेमी X 5 सेमी ते 60 सेमी X 60 सेमी पर्यंत असावा. हा लोगो वेबसाइट, ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर वापरला जाईल. यासह, तो प्रेस रीलिझ, स्टेशनरी आणि लेबले आदींवर प्रिंट करण्यात येणार आहे, तर त्या दृष्टीने तो बनवलेला असावा. लोगो किमान 300 डिपीआयसह (dpi) उच्च रिझोल्यूशनमध्ये असावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम सध्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत आहे. या कार्यक्रमांतर्गत मोदींना त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. यासोबतच त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला आपले विचार आणि सूचना देण्याचे आवाहनही केले आहे.