Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Celebrity Startup Investment: सेलिब्रिटींची स्टार्टअपमधील गुंतवणूक वाढली; पाहा कोणी कोठे केली गुंतवणूक?

Investment

बॉलिवूड सेलिब्रिटींची स्टार्टअप कंपन्यांतील गुंतवणूक वाढत आहे. आलिया भट, संजय दत्त, सुनिल शेट्टी, कॅटरिना कैफ, परिणिती चोप्रा सह इतरही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी डायरेक्ट-टू-कन्झ्युमर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

Celebrity Startup Investment: व्हेंचर कॅपिटल आणि प्राइव्हेट इक्विटी फर्मद्वारे स्टार्टअप कंपन्यांमध्ये होणारी गुंतवणूक 4 वर्षांच्या निचांकावर पोहचली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे, सेलिब्रिटींची स्टार्टअप कंपन्यांमधील गुंतवणूक वाढली आहे. डायरेक्ट टू कन्झ्युमर स्टार्टअप कंपन्यांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्स स्टार्सची गुंतवणूक दुपटीने वाढली आहे.

स्टार्टअपमधील सेलिब्रिटींची गुंतवणूक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने बेबी केअर प्रॉडक्ट “सुपर बॉटम्स” कंपनीत नुकतीच गुंतवणूक केली आहे. या महिन्याच्या सुरूवातील परिणीती चोप्राने पर्सनल केअर ब्रँड ‘क्लिन्स्टा’ कंपनीत गुंतवणूक केली. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने ‘जस्ट माय रुट्स’ या फूड डिलिव्हरी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. तर बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता सुनिल शेट्टीने हेल्थकेअर क्षेत्रातील 'बायो हॅकर' कंपनीत गुंतवणूक केली.

सेलिब्रिटींची गुंतवणूक वाढणार 

स्टार्टअप कंपन्यांमधील सेलिब्रिटींची गुंतवणूक आणखी वाढत जाईल, असे या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना वाटते. यातील बऱ्याच कंपन्या थेट ग्राहकांशी संबधीत आहे. यातील गुंतवणुकीत जोखीम कमी आणि परतावा चांगला मिळण्याची शक्यता असल्याचे हाय नेटवर्थ इंडिव्ह्युज्युअल (HNI) या कंपन्यांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. 

दीर्घ कालावधीत सेलिब्रिटींना अशा गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळतो. व्हेंचर कॅपिटल फर्मची स्टार्टअप कंपन्यांमधील गुंतवणूक मागील 4 वर्षांपासून कमी झाली आहे. कोरोना काळात गुंतवणूक सर्वाधिक होती. मात्र, त्यानंतर स्टार्टअप कंपन्यांना नफा कमावणे अवघड झाल्याने अनेक कंपन्या तोट्यात गेल्या. खर्च कमी करण्यासाठी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. त्यानंतर मोठ्या व्हेंचर कॅपिटल फर्म स्टार्टअप कंपन्यांतून बाहेर पडल्या. बायजू, गो मॅकॅनिक या कंपन्या अडचणीत सापडल्या. 

सेलिब्रिटींची डायरेक्ट टू कन्झ्युमर कंपन्यातील गुंतवणूक

मागील तिमाहीत संजय दत्तने Cartel & Bros या अल्कोहोल आणि बिव्हिरेजेस कंपनीत गुंतवणूक केली. तर डायरेक्ट टू कस्टमर क्षेत्रातील हेल्थ फूड बनवणाऱ्या WickedGud कंपनीमध्ये शील्पा शेट्टीने अडीच कोटींची गुंतवणूक केली. कॅटरिना कैफने हेल्थ आणि वेलनेस क्षेत्रातील Hyugalife या कंपनीत गुंतवणूक केली. तर सुनिल शेट्टीने Klassroom या कंपनीत गुंतवणूक केली. अक्षय कुमारने गुड ग्लॅम ग्रूप सोबत मिळून जॉइंट व्हेंचर स्थापन केले. ही कंपनी पुरुषांसाठी पर्सनल केअर प्रॉडक्ट तयार करते.