National Institute of Photography: प्रा. मनोहर देसाई यांनी फोटोग्राफीचे ज्ञान तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि फोटोग्राफीमध्ये करिअर(Photography career) करण्यासाठी किंवा फोटोग्राफी छंद म्हणून जोपासण्यासाठी 1983 मध्ये दादर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफीची(NIP ) स्थापना केली. आजतागायत या संस्थेमधून हजारो विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे आणि ते आता भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फ्री-लान्सर फोटोग्राफर म्हणून किंवा स्वतंत्र फोटोग्राफर म्हणून स्टुडिओ चालवत आहेत. या संस्थेअंतर्गत विविध कोर्सेस चालवले जात आहेत ज्यामध्ये थिअरी व प्रॅक्टिकलचा समावेश करण्यात आलेला आहे. वाइल्ड लाइफ फोटोग्राफी, बर्ड फोटोग्राफी, नेचर, स्पोर्ट्स आणि मायक्रो फोटोग्राफी यासारख्या वेगवेगळ्या प्रकारातील फोटोग्राफी तुम्हाला येथे शिकायला मिळणार आहे. या संस्थेमध्ये भारतातील विविध राज्यांमधून अनेक विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतात.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी संस्थेच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे कोर्सेस
डिप्लोमा इन वेडिंग अँड इव्हेंट फोटोग्राफी (Diploma in Wedding & Event Photography)
कोर्सचा कालावधी - ६ महिने
पात्रता - बारावी
याकरिता कोणतीही पूर्व परीक्षा नाही
डिप्लोमा इन फॅशन फोटोग्राफी (Diploma in Fashion Photography)
कोर्सचा कालावधी - ७ महिने
पात्रता - बारावी
सर्टिफिकेट इन बेसिक कोर्स इन फोटोग्राफी (Certificate in Basic Course in Photography)
कोर्सचा कालावधी - ५ आठवडे
पात्रता - बारावी
सर्टिफिकेट इन ॲडव्हान्स कोर्स इन फोटोग्राफी (Certificate in Advance Course in Photography)
कोर्सचा कालावधी - २ महिने
पात्रता - बारावी
क्रॅश कोर्स इन फोटोग्राफी (Crash Course in Photography)
कोर्सचा कालावधी - ८ दिवस
पात्रता - बारावी
प्लोमा इन टेबल टॉप फोटोग्राफी (Ploma in Table Top Photography)
कोर्सचा कालावधी - ६ महिने
पात्रता - बारावी
डिजिटल फोटो एडिटिंग टेक्निक्स (Digital Photo Editing Technics)
कोर्सचा कालावधी - ४५ दिवस
पात्रता - बारावी
आर्ट्स सिनेमॅटिक (Arts Cinematic)
कोर्सचा कालावधी - ९ आठवडे
पात्रता - बारावी
फाउंडेशन कोर्स इन फोटोग्राफी (Foundation Course in Photography)
कोर्सचा कालावधी - १ महिना
पात्रता - बारावी
कन्व्हेंशनल व्हिडिओ (Conventional Video)
कोर्सचा कालावधी - २ महिने
पात्रता - बारावी
प्रवेश प्रक्रिया आणि अधिक माहितीसाठी संपर्क
- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान शिक्षण मर्यादा बारावी असून त्यासाठी कुठलीही पूर्व प्रवेश परीक्षा नाही
- प्रथम येणाऱ्या प्राधान्य दिले जाईल व प्रवेश मिळेल
- अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://www.focusnip.com या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी