Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car sales : नोव्हेंबरमध्ये पुरवठा वाढल्यानंतरही कारच्या विक्रीत तेजी

Car sales

यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात मोटारींचा पुरवठा वाढल्यानंतरही ऑटोमोबाईल (Automobile) विक्रीत २८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरशी वर्षभराच्या आधारे तुलना केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.

यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात मोटारींचा पुरवठा वाढल्यानंतरही ऑटोमोबाईल (Automobile) विक्रीत २८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरशी वर्षभराच्या आधारे तुलना केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. भारतात ऑक्टोबरच्या सणासुदीच्या काळात कारची मागणी वाढल्यानंतर नोव्हेंबरमध्येही कारच्या विक्रीत चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे. कार उत्पादकांची संघटना असलेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (Society of Indian Automobile Manufacturers) किंवा सियामच्या आकडेवारीनुसार,  नोव्हेंबर महिन्यात 2.76 लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे.

प्रवासी कार विक्री 29 टक्क्यांनी वाढली (Passenger car sales increased by 29 percent)  

वर्षभरापूर्वी नोव्हेंबर महिन्यात 2.15 लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. जर टाटा मोटर्सच्या 46,425 युनिट्सचीही भर पडली तर कार विक्रीचा हा आकडा 32 टक्के होईल. टाटा मोटर्स दर महिन्याला सियामला वाहन विक्रीचे आकडे प्रस्तुत करत नाही. या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रवासी कार विक्री 29 टक्क्यांनी वाढून 1.30 लाख युनिटपर्यंत पोहोचली आहे. त्याचप्रमाणे युटिलिटी वाहनांची विक्री एक तृतीयांश वाढून 1.38 लाख युनिटवर पोहोचली आहे.

कारची विक्री सुमारे 30 टक्क्यांनी वाढली (Car sales increased by around 30 percent)

भारतातील कार निर्माते कारखान्यातून डीलरशिपकडे पाठवलेल्या कारचे आकडे जाहीर करतात, ते किरकोळ विक्रीचे आकडे जाहीर करत नाहीत. सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले, "नोव्हेंबर 2022 मध्ये कार विक्रीचे उत्कृष्ट आकडे समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत, या वर्षी नोव्हेंबरमध्ये कारची विक्री सुमारे 30 टक्क्यांनी वाढली आहे. ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत मात्र, नोव्हेंबरमध्ये कारची विक्री कमी झाली आहे."

मोटरसायकलची विक्री 12.7 टक्क्यांनी वाढली  (Motorcycle sales increased by 12.7 percent)

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स किंवा सियामच्या आकडेवारीनुसार, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तीन चाकी वाहनांची विक्री दुपटीने वाढून 45,664 युनिट्सवर पोहोचली आहे. SIAM च्या मते, जर आपण टू व्हीलर सेगमेंटबद्दल बोललो तर या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याची घाऊक विक्री 16.5 टक्क्यांनी वाढून 12.36 लाख युनिट्सवर पोहोचली आहे. नोव्हेंबरमध्ये मोटरसायकलची विक्री 12.7 टक्क्यांनी वाढून 7.888 लाख युनिट झाली, तर स्कूटरची विक्री 29 टक्क्यांनी वाढून 4.12 लाख युनिट झाली.

मारुती सुझुकीची विक्री वाढली (Maruti Suzuki sales increased)

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI - Maruti Suzuki India) ची एकूण घाऊक विक्री नोव्हेंबर 2022 मध्ये 14 टक्क्यांनी वाढून 1,59,044 युनिट झाली. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये डीलर्सना 1,39,184 वाहनांचा पुरवठा केला आहे. या कालावधीत MSI ची देशांतर्गत विक्री 18 टक्क्यांनी वाढून 1,39,306 युनिट्स झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांनी 1,17,791 युनिट्सची विक्री केली. कंपनीच्या छोट्या कार- अल्टो आणि एस-प्रेसोची विक्री मागील महिन्यात 17,473 युनिट्सवरून 18,251 युनिट्सपर्यंत वाढली आहे.