Canara Bank Doorstep Banking: कॅनरा बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी खास डोअरस्पेट बँकिग अभियान सुरू केले आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी असणार असून 3 सेवा मोफत मिळवता येतील. कॅनरा ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे.
कधीपर्यंत मिळेल सुविधा
कॅनरा बँकेने या अभियानाची माहिती X सोशल मीडियावर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे. त्यानुसार 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे. 3 सेवांसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. बँक प्रतिनिधी घरी येऊन बँकिंग सेवा देईल.
कोणत्या सुविधांचा फायदा घेता येईल?
चेक, ड्राफ्ट, पे ऑर्डर घरी येऊन स्वीकारला जाईल.
बँक खात्याचे स्टेटमेंटची विनंती करता येईल.
नव्या चेक बुकसाठीचा अर्ज घरी येऊन स्वीकारला जाईल.
ड्राफ्ट, पे ऑर्डर, टर्म डिपॉझिट, पावती पोहच केली जाईल.
5G, 15H फॉर्म स्वीकारला जाईल.
TDS/फॉर्म 16 प्रमाणपत्रासंबंधित काम
प्रिपेड व्यवहारांची कागदपत्रे, गिफ्ट कार्डची डिलिव्हरी
कॅश संबंधित व्यवहार 10 हजारापर्यंत तसेच डिजिटल लाइफ प्रमाणपत्र सेवा इ.
ऑनलाइन सेवा कशी बुक करता येईल?
कॉल सेंटरला फोन करून सर्व्हिस ऑर्डर बुक करता येईल. याशिवाय अॅप आणि बँक वेबसाइटवरूनही डोअरस्टेप सर्व्हिस बुक करता येईल.
कॅनरा बँकेकडून डोअरस्टेप बँकिगसुविधेसाठी 88.50 रुपये आकारले जातात. हे शुल्क अभियान काळात आकारले जाणार नाही. ज्या ग्राहकांचे जॉइंट खाते आहेत, त्यांनाही या सुविधेचा फायदा घेता येईल.
बँकेचा प्रतिनिधी ग्राहकांच्या घरी येईल. बँकेचा युनिफॉर्म आणि आयडीकार्ड त्याच्याकडे असेल. प्रतिनिधीची खात्री करण्यासाठी व्यवहार करताना त्याच्याकडील कॉमन सर्व्हिस कोड ग्राहकांना तपासता येईल. चेक किंवा इतर कोणतीही कागदपत्र पूर्ण भरून (A/C PAYEE CROSSED) केलेले असावे.