Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Treasury bill investment: 'ट्रेझरी बिल' हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असू शकतो का?

Treasury bill investment, Investment

Treasury bill investment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI (Reserve Bank of India)रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँका मुदत ठेवींच्या व्याजदरात (FD Rate Hike) सातत्याने वाढ करत आहेत. अशातच जर तुम्हाला कमी कालावधीत अधिक परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही ट्रेझरी बिलांमध्ये गुंतवणूक करू शकता, याबाबत अधिक माहितीसाठी हा लेख पुढे वाचा.

Treasury bill investment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI (Reserve Bank of India)रेपो दरात वाढ केल्यानंतर आता बँका मुदत ठेवींच्या व्याजदरात (FD Rate Hike) सातत्याने वाढ करत आहेत. परंतु, अल्प मुदतीच्या एफडीवरील व्याजदर वाढवण्यात बँकानी अजूनही सुरवात केलेली नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अजूनही एक किंवा दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर फक्त 6.1 टक्के व्याज देत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कमी कालावधीत अधिक परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही ट्रेझरी बिलांमध्ये गुंतवणूक करू शकता. RBI कडून दर आठवड्याला ट्रेझरी बिले जारी केली जातात. दीर्घ दिनांकित बाँड्स आणि ट्रेझरी बिल्स (टी-बिल) मध्ये, पूर्वी फक्त बँका किंवा मोठ्या वित्तीय संस्था (Financial institutions) गुंतवणूक करू शकत होत्या. परंतु, आता किरकोळ गुंतवणूकदारही (Retail investors)त्यात गुंतवणूक करू शकतात आणि गॅरंटीसह मिळणार्‍या आकर्षक परताव्याचा लाभ घेऊ शकतात. रिझर्व्ह बँकेने ऑफर केलेल्या 364 दिवसांच्या ट्रेझरी बिलावरील उत्पन्न 6.94 टक्के आहे.

ट्रेझरी बिलांचे तीन प्रकार (Three Types of Treasury Bills)

91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस हे ट्रेझरी बिलांचे तीन प्रकार आहे. टी-बिले त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा सवलतीने जारी केली जातात. त्यांची मुदत संपल्यावर, गुंतवणूकदाराला त्यांची वास्तविक किंमत मिळते. उदा. 91 दिवसांच्या टी बिलाचे खरे मूल्य रु. 100 आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला ते 97 रुपयांच्या सवलतीत (Discount) मिळाले, तर त्याला 91 दिवसांनंतर मॅच्युरिटीवर 100 रुपये परत मिळतील, अशा प्रकारे त्याला रु.3 चा नफा मिळेल. तिन्ही प्रकारच्या ट्रेझरी बिलांमध्ये 25,000 रुपयांची किमान गुंतवणूक करावी लागेल.

उत्तम परतावा (Return)

साधारणपणे 91 दिवसांच्या T-Bill चा परतावा (Return) 6% ते 7.5% च्या दरम्यान असतो. त्याच वेळी, 364 दिवसांच्या टी-बिलचे उत्पन्न 6.94 टक्के आहे. व्हॅल्यू रिसर्चनुसार, 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत एक वर्षाच्या मनी मार्केट फंडाचा परतावा 3.97 टक्के होता. त्याचप्रमाणे, कमी कालावधीच्या निधीचा सरासरी परतावा 3.39 टक्के आणि तरल निधीचा परतावा 4.16 टक्के आहे. अशाप्रकारे टी-बिलने एका वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक परतावा दिला आहे. T-Bill मधून मिळणाऱ्या कमाईवर कर सूट नाही. टी-बिलमधून मिळणारा नफा हा अल्पकालीन भांडवली नफा (Short term capital gains) मानला जातो. 

नुकसान (Loss) 

टी-बिले इतर शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा कमी परतावा देतात कारण त्या शून्य-कूपन सिक्युरिटीज आहेत आणि सवलतीने लागू केल्या जातात. आर्थिक परिस्थिती आणि व्यवसाय चक्रातील बदल लक्षात न घेता, संपूर्ण कालावधीत परतावा सारखाच राहतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या विरोधात, बाजारातील परिस्थिती आणि इतर घटकांच्या प्रभावाखाली, ट्रेझरी बिलांचे उत्पन्न खूपच कमी आहे. गुंतवणूकदार ज्या आयकर स्लॅब अंतर्गत येतो त्यानुसार ट्रेझरी बिल्समधून मिळालेल्या नफ्यावर शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन (STCG) कर लागू होतो.