Canada Bumper Jobs: जगभरात कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकर कपात(Employee reduction) करत असताना कॅनडामध्ये(Canada) मोठ्या प्रमाणावर नोकर भरती केली जात आहे. नव्या लेबर फोर्स सर्व्हेनुसार(Labor Force Survey) कॅनडामध्ये नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या क्षेत्रात 10,000 नवीन नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. देशातील नवीन नोकऱ्यांमुळे बेरोजगारीचा दर(Unemployment rate) 5.1 टक्क्यांवर आला असून या दरम्यान रोजगार सहभाग दर 64.8 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. यासोबत सर्वेतील डेटावरून असे दिसून आले आहे की, नोव्हेंबरमध्ये सलग 6 महिन्यात कर्मचाऱ्यांचे सरासरी तासाचे वेतन नोव्हेंबर 2021 पासून 5 टक्क्यांपेक्षा जास्त 32.11 डॉलरवर राहिले आहे. याचा अर्थ असा होतो की आगामी काळात नवीन लोकांना अधिक उत्पन्नासह काम करण्याच्या जास्त संधी मिळतील.
या क्षेत्रांमध्ये आहेत सर्वाधिक नोकऱ्या
कॅनडामध्ये फायनान्स(Finance), विमा(Insurance), रिअल इस्टेट(Real estate), रेंटल आणि लीजिंग(Rental and Leasing), मॅन्युफॅक्चरिंग(Manufacturing), इन्फॉर्मेशन(Information), कल्चर आणि एंटरटेनमेंट(Culture and Entertainment) या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती केल्याचे दिसून आले आहे. सर्वेनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या संख्येत 21,000 ची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधील रोजगार किती टक्क्यांनी वाढला?
कॅनडामधील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीतील(Manufacturing industry) रोजगारामध्ये 1.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय अल्बर्टा(Alberta) राज्यातील उद्योगातील रोजगारामध्ये 4.7 टक्के वाढ झाली असून क्यूबेकमध्ये(Quebec) मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 10,000 पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
कन्स्ट्रक्शन्स इंडस्ट्रीतील रोजगार किती टक्क्यांनी घटला?
लेबर फोर्सने केलेल्या ऑक्टोबर 2022 मधील शेवटच्या सर्वेक्षणानुसार संपूर्ण कॅनडामध्ये कन्स्ट्रक्शन्स इंडस्ट्रीतील(Construction Industry) रोजगारात 1.6 टक्क्यांनी घट झाली आहे. घाऊक आणि किरकोळ व्यापार क्षेत्रातील रोजगार देखील नोव्हेंबरमध्ये घसरला आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीला कॅनडा एक्सप्रेस एंट्री ड्रॉचे(Express Entry Draw) आयोजन करू शकतो.ज्यामुळे विशिष्ट व्यवसायामध्ये काम करणार्या परदेशी नागरिकांना किंवा विशिष्ट भाषा कौशल्ये/शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध होईल.