Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मुद्रांक शुल्क (Stamp Duty) म्हणजे काय? ते कसे आकारले जाते?

Stamp Duty

निवासी आणि व्यावसायिक मालत्तेच्या (Property) व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. मालमत्तेसंबंधीचा हा कर (Tax) मानला जातो. तो सरकारच्या नियमाप्रमाणे भरावा लागतो.

What is Stamp Duty : कोणत्याही मालमत्तेसंबंधीचा व्यवहार होतो, तेव्हा जो टॅक्स (Tax) भरला जातो, त्याला मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) असं म्हटलं जाते. निवासी आणि व्यावसायिक मालत्तेच्या (Property) व्यवहारावर मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. विक्रीकर आणि प्राप्तिकराप्रमाणेच (Sales Tax & Income Tax) मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. मालमत्तेसंबंधीचा हा कर (Tax) मानला जातो. तो सरकारच्या नियमाप्रमाणे भरावा लागतो. तसेच स्टॅम्प ड्युटी हा तुमच्या मालमत्तेच्या कायदेशीर व्यवहाराचा पुरावा आहे. विशेष म्हणजे प्रॉपर्टी संदर्भात काही वाद उद्भवल्यास मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरल्याची पावती हा न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येते. स्टॅम्प ड्युटीद्वारे प्रॉपर्टीची मालकी सिद्ध करता येते.

तुमची मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करताना मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. एखादी मालमत्ता जेवढ्यावेळी हस्तांतरित होते, तेवढ्या वेळा सरकारकडे मुद्रांक शुल्क भरावे लागते. तो सरकारचा अधिकार आहे. मालमत्ता नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांवर सरकार हे शुल्क आकारते. मुद्रांक शुल्क भरणे हे भारतीय मुद्रांक कायदा,1989 च्या कलम 3 नुसार अनिवार्य आहे. राज्यापरत्वे मुद्रांक शुल्कात फरक पडतो. नोंदणी करार प्रमाणित करण्यासाठी मुद्रांक शुल्क राज्य सरकार जमा करते.


हे शुल्क कसं आकारलं जातं!

मालमत्तेच्या बाजारमूल्यानुसार त्यावर मुद्रांक शुल्क किती आकारणार याची माहिती मिळू शकते. सरकारने याबाबत काही बेसिक नियम केले आहेत. त्यानुसार किमान आणि कमाल जागेच्या आकारानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते. रेडी रेकनर दरावरुन स्टॅम्प ड्युटी किती लागेल, हे कळू शकते.

तुम्हाला संबंधित विभाग, गावाचं नाव आणि सी. एस. अथवा सीटीएस क्रमांक (city survey number) याची माहिती घ्यावी लागते.

रेडिरेकनरच्या तक्त्यात मालमत्तेविषयी प्रति चौरसमीटर काय दर आहे, त्यानुसार मुद्रांक शुल्क ठरते आणि  आकारण्यात येते.

मालमत्तेचे बाजारमूल्य ठरवण्यासाठी रेडी रेकनरप्रमाणे मालमत्तेत किती वाढ झाली आणि इतर घटकांचा वापर करण्यात येतो.  बाजारमूल्य मिळाले की किती मुद्रांक शुल्क द्यावे लागेल हे निश्चित होते. या प्रक्रियेला अभिनिर्णय म्हणतात.

असे भरा मुद्रांक शुल्क ऑनलाईन!

मुद्रांक शुल्क ऑनलाईनही भरता येते. महाराष्ट्र सरकारच्या https://gras.mahakosh.gov.in/echallan/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी भरता येते. तुम्ही प्रथमच याचा वापर करत असाल तर तुम्हाला नाव नोंदणी करावी लागेल. यामध्ये मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडीचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. पुढील तपशील आणि प्रक्रिया पूर्ण केल्यावर मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरता येईल.

सुविधेवर मुद्रांक शुल्काचा आकार!

मालमत्तेच्या सुविधांवरही मुद्रांक शुल्क ठरते. अधिक सुविधा प्राप्त सोसायटी, हब याठिकाणी मालमत्ता खरेदी केल्यास अशा ठिकाणी अधिकचे मुद्रांक शुल्क मोजावे लागते. हॉल, स्विमिंग पूल, क्लब, जिम, स्पोर्टस एरिया, लिफ्ट, चिल्ड्रन एरिया अशा सुविधा असल्यास तुम्हाला अधिकचे मुद्रांक शुल्क मोजावे लागते.

असे वाचविता येईल शुल्क!


मुद्रांक शुल्क टाळता येत नाही. ते भरणे कायद्याने अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु, मालमत्ता घरातील स्त्रीच्या नावे खरेदी केली जात असेल तर त्यात सवलत मिळते. पण ते पूर्णत: टाळता येत नाही. सरकारने महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना समान हक्क मिळावा यासाठी मुद्रांक शुल्कात सवलती दिल्या आहेत. या सवलतींचा फायदा घेऊन मुद्रांक शुल्काची रक्कम कमी नक्कीच करता येई शकेल.