Konkani People will Benefit from the Budget: 2023 चा अर्थसंकल्प हा कोकणवासीयांसाठी अधिक फायदेशीर आहे. कारण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या त्यांना जाहीर केलेल्या काही योजनांचा मोठा लाभ होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोकणवासी आनंदित असल्याचे दिसत आहे. पण प्रत्यक्षात त्यांना कोणत्या योजनांचा लाभ होणार आहे, हे जाणून घेवुयात.
कोणत्या क्षेत्रांचा यामध्ये समावेश? (Which Fields are Included in this)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये लघु व सुक्ष्म उद्योग, कृषी संबंधित योजना, बंदरे व जलवाहतूक, मत्स्य व्यवसाय, तृणधान्य व आदि कोकणसंबंधी व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे. तसेच अल्पबचत एजंट, रेल्वे व तिसऱ्या श्रेणीतील शहरांचा विकास व निर्यातप्रधान उद्योगांचादेखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
तरूण उदयोजकांना फायदा (Benefit to Young Entrepreneurs)
केंद्रीय लघू व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या खात्या अंतर्गत नवीन उद्योग सुरू करण्यासाठी क्रेडीट स्कीम योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच या योजनेसाठी 9 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कमीत कमी कोकणात राहणाऱ्या 500 तरूण उदयोजकांना मिळू शकतो. तसेच अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीलादेखील प्रोत्साहन देण्यात आले आहे. हा विचार करता कोकणात दहा सहकारी उद्योग सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
मच्छी व्यवसायिकांना फायदा (Benefits to Fishmongers)
किनाऱ्यावरील जहाज उद्योगासाठीदेखील घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा खासगी सहभागासाठी आहे. यासंबंधी अंदाज लावता, कोकणात चार बंदरे विकसित होण्याची शक्यता आहे. तर मच्छी पालन करणाऱ्यांसाठी सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर कोळंबी उत्पादनासाठी सीमा शुल्क कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना अर्थसंकल्पाचा अधिक फायदा होणार असल्याचे दिसत आहे.