Christmas 2022: जुन्या वर्षाला बाय बाय करुन नवीन वर्षाच्या स्वागताला आपण सगळेच तयार आहोत. ख्रिसमस आणि नवीन वर्ष दोन्हीही आता काही दिवसांवर आले आहेत. तुम्ही सगळेच नवीन वर्ष 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहात. तुमच्या मित्रांमध्ये या संदर्भातील प्लॅन देखील ठरले असतील. ख्रिसमस सेलिब्रेशन किंवा ३१ डिसेंबरच्या इयर एन्ड पार्टीसाठी सगळेच हॉटेल-रेस्टॉरंट्स नवीन ऑफर्स देत आहेत. म्हणूनच 'Mahamoney' खास तुम्हाला अशा काही रेस्टॉरंट्स बद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही ख्रिसमस आणि नवीन वर्षाची पार्टी एकदम आनंदात साजरी करू शकता. चला तर जाणून घेऊयात याबद्दल.
Table of contents [Show]
सना दिगे, दिल्ली (Sana Dige, Delhi)
सना दिगे रेस्टॉरंट दिल्लीमध्ये असून या हॉटेलमध्ये ख्रिसमसचे सण साजरे करण्यासाठी नवनवीन योजना आखल्या जातात. येथील शाकाहारी मेनूमध्ये पनीर घी रोस्ट, लोटस स्टेम ब्लॅक पेपर, बेबी कॉर्न बटर ब्लॅक पेपर विथ गार्लिक यासारखे स्वादिष्ट पदार्थ समाविष्ट आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.
मंकी बारमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने 15 दिवस सेलिब्रेशन चालते. याठिकाणी चविष्ट पदार्थांसह संगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते . तुम्हीही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत या हॉटेलमध्ये नक्की जा आणि ख्रिसमसचा आनंद घ्या.
ब्रूडॉग, गुरुग्राम (Brewdog, Gurugram)
जर तुम्हाला तुमचा ख्रिसमस दिल्लीमधील रेस्टॉरंटमध्ये साजरा करायचा असेल तर ब्रूडॉगच्या ख्रिसमस स्पेशल कॉकटेलपेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकत नाही. येथे लाल आणि पांढर्या थीमच्या सजावटीसह तुमचे आणि तुमच्या प्रिय मित्रांचे स्वागत केले जाते.
मिस मार्गारीटा (Miss Margarita)
मिस मार्गारीटा हॉटेलमध्ये ख्रिसमसच्या सेलिब्रेशन 12 दिवस चालणार आहे. येथे दररोज नवीन ऑफर्ससह तुम्ही हॉटेलचे प्री-बुकिंग करू शकता.
ओएमओ: सोल फूड कम्युनिटी (OMO: Soul Food Community)
गुरुग्रामचे OMO - सोल फूड कम्युनिटी कॅफेमध्ये (OM0: SOUL FOOD COMMUNITY) ख्रिसमसच्या दिवशी तुम्हाला स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येईल आणि यासोबतच तेथील डेकोरेशन सुद्धा तुमच्या मनाला प्रसन्नता देईल.
One8 कम्यून (One8 Commune)
ख्रिसमससाठी हॉटेलची संपूर्ण सजावट करण्यात आली आहे. One8 Commune चा "Sunday Brunch Club" जिथे तुम्ही खास शेफने तयार केलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा, आस्वाद घेऊ शकता.
कॅफे डी फ्लोरा (Cafe de Flora)
रम, केक आणि हॉट चॉकलेटपासून ते ग्रील्ड चिकन आणि कॉटेज चीजपर्यंत अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद तुम्हाला येथे घेता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही दिल्लीत असाल तर या हॉटेलमध्ये यायला विसरू नका.