Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BSNL नव्याने उभारी घेणार! 4G, 5G नेटवर्क उभारणीसाठी खर्च करणार कोट्यवधी रुपये

BSNL

बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी बजेटमध्ये 53 हजार 937 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून हा निधी कंपनीला मिळेल. या निधीतून देशभर 4G आणि 5G जाळे उभारण्यात येईल. एकेकाळी BSNL कंपनीचा दबदबा होता. मात्र, खासगी कंपन्यांच्या स्पर्धेतून बीएसएनएल बाहेर फेकली गेली आहे.

BSNL revival package: खासगी टेलिकम्युनिकेशन कंपन्यांच्या स्पर्धेत भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल नावापुरतीच शिल्लक राहिली आहे. एकेकाळी BSNL कंपनीचा दबदबा होता. मात्र, खासगी कंपन्यांच्या स्पर्धेतून बीएसएनएल बाहेर फेकली गेली आहे. रिलायन्स जिओ कंपनीने मोबाईल नेटवर्क सेवेमध्ये मक्तेदारी निर्माण केली आहे. मात्र, आता बीएसएनएल पुन्हा नव्याने कामाला लागली आहे. देशभर 4G आणि 5G सेवा उभी करण्यासाठी कंपनी तब्बल 53 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. लँडलाइन सुविधेलाही बळ देण्यात येणार आहे.

बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी बजेटमध्ये 53 हजार 937 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून हा निधी कंपनीला मिळेल. या निधीतून देशभर 4G आणि 5G जाळे उभारण्यात येईल. माहिती तंत्रज्ञान आणि टेलिकॉम खात्याचे केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव यांनी या वृत्तास दुजोरा दिला. मागील वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात बीएसएनएलच्या विकासासाठी 1.64 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यातील काही रक्कम यावर्षी देण्यात आली आहे.

कोणती कामे हाती घेण्यात येणार? (BSNL development plan)

बीएसएनएलने सार्वभौम कर्जरोख्याच्या माध्यमातूनही कर्ज उभे केले आहे. नवीन टॉवर, 4G, 5G टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन, एमटीएनएल लँडलाइन सुविधा उभारण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. दुर्गम प्रदेशातही नेटवर्क पोहचवण्यासाठी टॉवर उभारण्यात येणार आहेत. 2,158 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. संरक्षण खात्याच्या संपर्क व्यवस्थेच्या कामांसाठीही ईशान्य भारतात सातशे कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात येणार आहे.

100 पेक्षा जास्त लॅब देशभर उभारण्यात येणार (5G based 100 labs in country)

5G सेवेचे वापर करून अॅपलिकेश निर्मितीसाठी देशभर 100 लॅब सुरू करण्यात येतील, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली. याचा फायदा बीएसएनएललाही होणार आहे. जिओ आणि एअरटेल कंपनीने 5G नेटवर्क उभारणीचे काम सुरू केले आहे. या स्पर्धेत अद्याप बीएसएनएल मागे आहे. भारतामध्ये इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. अॅप बेस्ड सुविधाही ग्राहकांना सोईच्या ठरत आहेत. त्यामुळे 5G इंटरनेटवर आधारित सुविधा निर्माण करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे.