BSNL Broadband Plans: 2023 च्या सुरूवातीलाच BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडने ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. या कंपनीचे अनेक युजर्स मागील काही महिन्यांपासून स्वस्त प्लॅनचा लाभ घेत होते. आता यापुढे या युजर्सला कमी किंमतीतील प्लॅन वापरता येणार नाही. कारण नवीन वर्षात बीएसएनएल कंपनीने अनेक स्वस्त प्लॅन बंद केले आहेत. हे प्लॅन कोणते आहेत, याविषयी जाणून घेऊयात.
BSNL चा 275 रुपयांचा प्लॅन केला बंद
BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने 275 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. हा प्लॅनचा कालावधी 75 दिवसांचा होता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधादेखील होती. या प्लॅनची स्पीड 30Mbps होती. तर दुसऱ्या प्लॅनमध्ये 60Mbps ची स्पीड देण्यात आली होती. आता हा स्वस्त प्लॅन बंद करण्यात आला आहे.
BSNL चा 775 रुपयांचा प्लॅन ही केला बंद
बीसीएनएलचा हा 775 रूपयांचा प्लॅनदेखील बंद करण्यात आला आहे. या प्लॅनचा कालावधीदेखील 75 दिवसांचा होता. या प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडवर 3300TB डेटा देण्यात आला होता. हा डेटा समाप्त झाल्यावर याची स्पीड 4Mbps वर सुरू राहते. यामध्ये ओटीटीसह अनलिमिटेड लोकल कॉल व एसटीडी कॉलिंगची ही सुविधा दिली जात होती. तसेच SonyLiv, Zee5,Yupp Tv, Disney+HotStar, Voot, Shemaroo, Hungama, Lionsgate सारख्या फ्री सर्व्हिसेस दिल्या जात होत्या.
हे प्लॅन का झाले बंद
बीएसएनएल कंपनीने हे सर्व प्लॅन 1 जानेवारीपासून 2023 पासून म्हणजेच नवीन वर्षात बंद केले आहे. ज्यामध्ये 275 रूपयांचा व 775 रूपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. ही एक मर्यादित लिमिटेड ऑफर होती, जी 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली होती. आता या ऑफरचा कालावधी समाप्त झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. हे प्लॅन खरं तर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार होते, मात्र हे स्वस्तातील प्लॅन अचानक बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे समजत आहे.