Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bryan Johnson Anti Aging Formula : तरुण राहण्यासाठी 'हा' अमेरिकन उद्योजक काय करतो? त्यासाठी खर्च किती?

Brian Johnson Fitness

Image Source : www.bloomberg.com

तुम्ही देखील आपले वाढते वय आणि अवाढव्य वाढलेल्या शरीरष्टीमुळे त्रासले आहे का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका कंपणीच्या 45 वर्षीय CEO ने आपल्या कठोर दिनचर्येचे पालन करुन आणि एका मशीन द्वारे आपले शरीर तर पिळदार आणि स्ट्रॉग बनविले आहेच. शिवाय जगापुढे ती मशीन सादर करीत, आपल्या शरीरावर प्रेम करु करणाऱ्या आणि करोडो रुपये खर्च करण्याची ईच्छा असणाऱ्या फिटनेस प्रेमींसाठी एक नवा मार्ग दाखविला आहे.

Brian Johnson Fitness Machine : गेल्या काही दिवसांपासुन एक अमेरीकी आंत्रप्रेन्योर ब्रायन जॉनसन (Bryan Johnson) प्रचंड चर्चेत आहे. ते यासाठी, कारण त्याने कोटी रुपये खर्च करुन आपले शरीर अधिक पिळदार आणि फिट बनविले आहे. 45 वर्षीय ब्रायन जॉनसनला बघुन जणू असे भासते की, तो 18 च वर्षाचा आहे. मात्र हे सगळं करण्यास त्याने स्वत:वर कोटी रुपये खर्च केले आहेत. जाणून घेऊया त्याचा प्रवास.

30 मिनिटांत 20,000 उठाबशांचा व्यायाम

ब्रायन जॉनसन याने जगाची एका नव्या डिव्हाइसशी ओळख करुन दिलेली आहे. हे डिव्हाइस 20,000 उठाबशा काढल्यावर जेवढी एक्सरसाइज होत असते, तेवढी एक्सरसाइज 30 मिनिटांत करुन घेते. ब्रायन जॉनसन ने आपल्या या फिटनेस मशीनची ओळख लोकांना करुन दिली, तेव्हापासुन ते प्रचंड चर्चेत आहे. कॅलिफोरर्नियाचे अरबपती व्यक्ती असलेले ब्रायन यांनी प्रोजेक्ट ब्लूप्रिंटच्या माध्यमातुन आपले वय 5 वर्ष कमी केले असल्याचे सांगितले आहे.

ब्रायन जॉनसन Kernel कंपनीचे फाउंडर

आंत्रप्रेन्योर ब्रायन जॉनसन हे Kernel नावाच्या कंपनीचे सीईओ आणि फाउंडर आहे. ही कंपनी मेंदूच्या गतिविधींना मॉनिटर आणि रेकॉर्ड करते. ब्रायन यांनी प्रोजेक्ट ब्लूप्रिंटच्या माध्यमातुन आपले वय 5 वर्ष कमी केले असल्याचे सांगितले आहे. तसेच ते दैनंदिन जीवनात कठोर नियमांचं पालन करतात. शिवाय शुध्द शाकाहारी आहारालाच प्राधान्य देतात. ब्रायन यांनी आपला एक व्हिडीओ इंस्टाग्राम वर शेअर करीत आपल्या फॉलोअर्सची एका नव्या फिटनेस डिव्हाइस सोबत ओळख करुन दिली. तसेच, ते या डिव्हाइसच्या माध्यमातुन दररोज केवळ 30 मिनिटात 20,000 उठाबशा काढत असल्याचेही सांगितात.

ब्रायनने दिला मशीनचा डेमो

ब्रायन जॉनसन यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओ मध्ये मशीनचा डेमो दाखविला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या पोटाला एक बेल्ट बांधला आहे आणि तो बांधून एका बेंचवर झोपल्यानंतर ते मशीन सुरु करतात. पोटाला लावलेल्या एका बेल्ट मध्ये एक यंत्र लागलेलं आहे, जे एका टच स्क्रिन उपकरणाशी जुळलेले आहे. हे यंत्र एका स्पिडवर सुरु केले जाते. त्यानंतर ते तुमच्या पोटाच्या चरबीवर आणि मसल्सवर एक्सरसाइज करते.

शेअर केला आपला अनुभव आणि दिनचर्या

व्हिडीओमध्ये आपल्या फॉलोअर्सला प्रक्टिकल करुन दाखविल्यानंतर  ब्रायन म्हणतात की,'ही मशीन लावल्यानंतर मला फार त्रास होईल असे वाटत होते, मात्र असे काहीच झाले नाही. यामुळे मी स्वत: आश्चर्यचकीत आहे. या मशीनमुळे मी माझा पोटाचा भाग मजबुत बनवु शकलो आणि आता मी स्वत:ला एका अॅथलेटिक्स सारखं फिल करीत आहे.'

यानंतर ब्रायन जॉनसनने म्हणटले की,'मी वाढत्या वयास कारणीभूत असलेल्या गोष्टींना थांबविण्यासाठी जो काही प्रोटोकॉल विकसित केला आहे, त्यासाठी मी लाखो डॉलर खर्च केले आहे. आणि या मशीनचा उपयोग करुन आपण 30 मिनिटांमध्ये 20,000 उठाबशा काढीत व्यायाम केल्या प्रमाणे अनुभव मिळतो.'

ब्रायन जॉनसन हे कर्नेल व्यतीरिक्त ब्लूप्रिंट,OS फंड आणि बेंट्री वेनमोचे देखील फाउंडर आहे. ते दररोज 1,977 कॅलरी घेतात आणि दररोज एक तास एक्सरसाइज करतात. ते दररोज सकाळी 5 वाजता उठतात, केवळ रात्रीच झोपतात. आणि दररोज दोन डझन सप्लीमेंट, क्रिएटिन आणि कोलेजन पेप्टाइड्सच्या ग्रीन ज्यूस सोबत आपल्या दिवसाची सुरुवात करतात.