Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5 Crore Lottery Won: 40 वर्ष तिकिट खरेदी केले व वयाच्या 88 वर्षी लागली 5 कोटीची लॉटरी

88-Year-Old Man Wins Rs 5 Crore Lottery

88-Year-Old Man Wins Rs 5 Crore Lottery: पंजाबमधील एक वृध्द सलग 40 वर्ष लॉटरीचे तिकिट खरेदी करीत होते. मात्र प्रत्येकी वेळी त्यांची निराशा झाली. पण कुठेही थांबले नाहीत. मग शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व वयाच्या 88 व्या वर्षी त्यांना 5 कोटीचे लॉटरीचे तिकिट लागले.

88-Year-Old Man Wins Rs 5 Crore Lottery : सलग 40 वर्ष तिकिट खरेदी केल्यानंतर वयाच्या 88 वर्षी लागली 5 कोटीची लॉटरी आश्चर्य वाटले ना. पण खरं आहे. कारण समय का फल हमेशा मिठा होता है या वाक्याला पंजाब येथील आजोबांनी सार्थ केले आहे. लॉटरीचे तिकिट ते कित्येक वर्ष खरेदी करत होते, मात्र शेवटी कित्येक वर्षांनी त्यांचे नशीब पालटले.

कोणाला लागली 5 कोटीची लॉटरी (Who Won the 5 crore Lottery)

पंजाब या राज्यातील बस्सी या गावात त्रिवेदी कॅम्पमध्ये राहणारे व्दारकादास यांना 5 कोटीची लॉटरी लागली आहे. त्यांचे वय साधारणपणे 88 आहे. त्यांना 35 ते  40 वर्षानंतर तब्बल 5 कोटीची लॉटरी लागली आहे. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले, असे म्हणता येईल.  

कधी लागला निकाल (When was the Result)

16 जानेवारीला पंजाब राज्य लोहरी मकर संक्रांती बंपर लॉटरी 2023 चा निकाल ऑनलाईन माध्ययमातून घोषित करण्यात आला. या बंपर लॉटरीमध्ये डेराबस्सीच्या व्दारकादास दास यांनी 5 कोटी रूपयांची रक्कम ही लॉटरी बक्षिसाच्या स्वरूपात जिंकली. या रक्कममधून 30 टक्के टॅक्सची रक्कम कट होऊन उर्वरीत सर्व पैसा द्वारकादास यांना देण्यात येणार असल्याचे सहाय्यक लॉटरी संचालक करम सिंग यांनी सांगितले.

काय करणार 5 कोटींचे (What to do with 5 Crores)

5 कोटीं रूपयांचे बक्षिस जिंकणारे व्दारकादास म्हणाले, मागील 35 ते 40 वर्षांपासून तिकिट खरेदी करीत होतो. मात्र इतक्या वर्षानंतर आज एवढी मोठी रक्कम हाती लागली आहे. ही रक्कम मी माझ्या दोन मुलांमध्ये व गाव डेरामध्ये वाटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलगा नरेंद्र शर्मा प्रतिक्रिया (Son Narendra Sharma Reaction)

वडीलांनी माझ्या पुतण्याला लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. यातून 5 कोटी रूपयांची लॉटरी लागल्यामुळे, आमच्या घरात व गावात खूप आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे मुलगा नरेंद्र शर्मा यांनी सांगितले आहे.