Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: आयात शुल्क कपातीमुळे निर्मिती क्षेत्राला फायदा, मोबाईलच्या किंमती होणार कमी

Budget 2023

इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा निर्मला सितारामन यांनी केली. पुढील आर्थिक वर्षात मोबाईल फोन, कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज बुधवारी Budget 2023 लोकसभेत सादर केला. इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा निर्मला सितारामन यांनी केली. (Budget 2023 updates) पुढील आर्थिक वर्षात मोबाईल फोन, कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

कॅमेरा लेन्स, बॅटरीवरील आयात शुल्क कमी(Camera Lense and battery import duty)

मोबाईल फोन मधील कॅमेऱ्यामध्ये लेन्सचा वापर करण्यात येतो. या लेन्स परदेशातून आयात करण्यात येतात. मात्र, आयात शुक्ल जास्त असल्याने मोबाईल निर्मितीची खर्चही वाढत होता. लेन्स आणि इतर सुट्या भागांवरील आयात शुल्क कमी केल्याने मोबाईल, लॅपटॉप, प्रोफेशनल कॅमेऱ्यांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. मोबाईल लेन्स, इलेक्ट्रिक उपकरणांतील बॅटरी, इव्ही गाड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. स्थानिक उद्योगांना याचा मोठा फायदा होणार आहे.

मागील आर्थिक वर्षात 31 मोबाईल फोन्सची निर्मिती

मागील एक वर्षात देशात 31 कोटी मोबाईल फोन्सची निर्मिती करण्यात आली. त्यांची एकूण किंमत 2.7 लाख कोटी इतकी होती. आयात शुल्क कमी केल्याने सूट्या पार्ट्सच्या किंमती आणखी कमी होतील. याचा फायदा उद्योगांना होईल, असे या क्षेत्रातील कंपन्यांनी म्हटले आहे. India Cellular and Electronics Association (ICEA)  मागील अनेक वर्षांपासून स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत होते. त्यांची मागणी या बजेटमध्ये मान्य झाली आहे.

भारत मोबाईल फोन्स निर्यातीचे हब म्हणून पुढे येत आहे. भारतामध्ये सर्व आघाडीच्या मोबाईल कंपन्यांचे निर्मिती प्रकल्प आहेत. अॅपल कंपनीनेही भारतामध्ये मोबाईल निर्मितीचे काम पूर्ण क्षमतेने सुरू केले आहे. आता सुट्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी झाल्याने भविष्यात भारताची निर्यात आणखी वाढू शकते. दरम्यान, भारताची वित्तीय तूट वाढत असल्याने काही वस्तूंचे उत्पादन शुल्क वाढवले आहे. किचनमधील चिमणी, सिगरेट, सोने, चांदी आणि प्लॅटिनम महाग झाले आहे.