Budget 2023: नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, पुढील तीन वर्षात देशातील कृषी क्षेत्रातील नैसर्गिक शेतीवर जोर देणार आहे.
नैसर्गिक शेतीला प्राधान्य (Preference for Natural Farming)
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, देशात कृषी क्षेत्रातील नैसर्गिक शेती करण्याचे प्रमाण वाढवावे, यासाठी या क्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुढील तीन वर्षात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी मदत केली जाणार आहे. जवळजवळ 1 कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचविण्याचा प्रयत्न असणार आहे. खते व कीटकनाशके बनविण्यासाठी 10 हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटर स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शासनाने कृषी कर्जाच्या मर्यादेत 20 लाख रूपयांपर्यंतची वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेणे अधिक सोपे होणार आहे. कृषी व कपडा वगळता इतर साहित्यांवर मुळ सीमा शुल्क 21 टक्क्यांवरून 13 टक्के करण्यात आले आहे.
स्टोरेज क्षमतेत करणार वाढ (Increase in Storage Capacity)
केद्र सरकार कृषी क्षेत्रासाठी स्टोरेज क्षमता म्हणजेच साठवण क्षमतेत वाढ करणार आहे. कापूस पिकासाठी पीपीपी प्रोग्राम अंतर्गत शासनाने योजना आखली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना धान्य साठवणूक करण्याची सुविधा मिळणार असल्याने, पीक उत्पादनाला योग्य भाव मिळण्यास याची मदत होईल. ज्या गावात सहकारी समित्या, प्राथमिक मस्त्य समित्या, डेअर सहकारी समित्या नाहीत, त्या गावात पुढील पाच वर्षात या सुविधा मिळणार आहेत.
कृषी स्टार्टअपला देणार प्रोत्साहन(Encouragement for Agricultural start-ups)
कृषी स्टार्टअपसाठीदेखील अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. जे कृषी मालासंबंधी स्टार्टअप आहेत, त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच कृषी स्टार्टअप्सला प्रोत्साहन करण्यासाठी अॅग्रीकल्चर अॅक्सलेटर फंड तयार केला जाणार आहे. पशुपालन, डेअरी व मस्त्यपालनावरदेखील भर देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.