Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BharatPe: अश्नीर ग्रोवरच्या अडचणी वाढणार, आर्थिक घोटाळ्याचा आरोप, कंपनीने पाठवली 88.67 कोटींची नोटीस

BharatPe

Image Source : www.bharatdetails.com

BharatPe: आघाडीची फिनटेक कंपनी 'भारतपे'चा माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर अडचणीत सापडला आहे. ग्रोवर आणि कुटुंबियांवर आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासंदर्भात कंपनीने 88.67 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस ग्रोवरला पाठवली आहे.

भारतपे (BharatPe) या फिनटेक कंपनीचा माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोवर (Ashneer Grover) याच्यावर पैशांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कंपनीच्या पैशांमधून स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या गरजा भागवल्या आणि घोटाळा केल्याचा ठपका ठेवत 'भारतपे'ने ग्रोवर विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. भारतपे ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ग्रोवरला 88.67 कोटींची नोटीस पाठवली आहे. (BharatPe sues former md ashneer grover for fraud)

भारत पेने ग्रोवर विरोधात 17 गुन्हे दाखल केले आहेत. ग्रोवरने पदावर असताना कंपनीतील जवळपास 83 कोटी रुपयांचा घोटाळा केला. त्याचबरोबर भारतपेची प्रतिमा मलीन केली आहे. त्यामुळे नुकसाई भरपाई म्हणून 88.67 कोटींची मागणी कंपनीने ग्रोवरकडे केली आहे. नुकताच भारतपेच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. भारतपे कडून ज्येष्ठ वकिल मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. ग्रोवर कुटुंबियांनी भारतपेची लूट केली आहे.  यात अश्नीर ग्रोवर त्याची पत्नी माधुरी ग्रोवर तसेच सासू-सासरे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी भारतपेमधून प्रचंड गैरफायदा उठवला असल्याचे रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले. या कुटुंबियांनी घर भाडे भरण्यासाठी, विमान प्रवासासाठी आणि वैयक्तिक खर्चासाठी भारतपेचे पैसे बेकायदेशीरपणे वापरले.

ग्रोवर यांनी भारतपे मधून राजीनामा दिल्यानंतर देखील ते स्वत:च्या सोशल मिडिया हॅंडलवरुन कंपनीची सातत्याने बदनामी करत राहिले, असे आरोप देखील करण्यात आला आहे. यामुळे जनमाणसात भारतपेची प्रतिमा मलिन झाली आहे. ग्रोवर यांनी हरियाणातील पानिपतमधले बनावट विक्रेते दाखवून कंपनीतून 71.7 कोटी लाटले आणि कुटुंबातील सदस्यांना हस्तांतर केले. या संपूर्ण व्यवहारात कुठेही खरेदी झाली नाही. त्याचबरोबर भरतीसाठी केलेला खर्च जीएसटी दंडाची रक्कम कुटुंबातील सदस्यांना हस्तांतर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

भारतपेने अश्नीर ग्रोवर आणि कुटुंबियांवर फौजदारी तक्रार देखील दाखल केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी तपास करत आहे. यात अश्नीर ग्रोवर दोषी आढळा तर 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.