बीजीएमआय (BattleGrounds Mobile India) भारतात परत आलंय. या गेमवरचे निर्बंध केंद्र सरकारतर्फे हटवण्यात आले. त्यानंतर यूझर्स आनंदित झाले. मात्र याच्या लाइव्ह (Live) सर्व्हर नसल्याच्या कारणानं गेम खेळणातना एरर्स (Errors) पाहायला मिळत होते. आता चाचणी केल्यानंतर याचं सर्व्हर लाइव्ह करण्यात आलंय. यासंदर्भातली माहिती बीजीएमआयच्या अधिकृत ट्विटर (Twitter) हँडलवरून शेअर करण्यात आलीय. त्यामुळे आता सर्व गेमर्स हा गेम खेळू शकणार आहेत, तो देखील एरर फ्री.
Table of contents [Show]
ट्विटरवर दिलं अपडेट
बीजीएमआयनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, की हॅलो प्रिय बीजीएमआय फॅन्स... आता सर्व्हर लाइव्ह करण्यात आलंय. जर तुम्हाला प्ले स्टोअरवर अपडेट संदर्भात काही मिळत नसेल तर तुम्ही ते या वेबसाइटवर देखील शोधू शकता. ट्विटसोबत वेबसाइटची लिंकही शेअर करण्यात आलीय. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही बीजीएमआय एपीकेच्या (BGMI APK ) माध्यमातूनही खेळू शकणार आहात.
Hello Dear Bgmi Fans,
— BattleGrounds Mobile India (@BattlegroundmIn) May 29, 2023
Server is live Now ?
If you have to not show update on playstore then checkout this website
:- https://t.co/8QdrLPR1EY
Thank You#BGMI #IndiaKiHeartbeat pic.twitter.com/zKDoBB9xMr
गेम ओपन करताना Error येत असेल तर फॉलो करा या स्टेप्स
- सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाइलचं इंटरनेट किंवा वाय-फाय बंद करावं
- आता Game open करावा
- तुम्हाला Network Not response Error असं दिसेल. याठिकाणी तुम्हाला OK वर क्लिक करावं लागेल.
- आता आता तुमच्या मोबाइलचं इंटरनेट किंवा वाय-फाय चालू करावं
- यानंतर तुम्हाला दिलेल्या तुमच्या Login IDनं गेम ओपन करावा
भारतात कसा परतला बीजीएमआय?
गेम मेकर कंपनी क्राफ्टननं 2021 साली पबजीचं (PUBG) भारतीय व्हेरिएंट बीजीएमआय भारतात लॉन्च केलं. सुरुवातीला ते केवळ अँड्रॉइड यूझर्ससाठी लॉन्च करण्यात आलं होतं. महिनाभरानंतर ते आयओएस (iOS) यूझर्ससाठीही खुलं करण्यात आलं. या सर्व प्रक्रियेनंतर कंपनीनं गेमिंग इव्हेंटसाठी इतर ब्रँड्ससोबत हातमिळवणी केली. पाहता पाहता बीजीएमआय प्रचंड लोकप्रिय झालं. मात्र हे सर्व चांगलं सुरू असताना मागच्या वर्षी जुलै 2022मध्ये आयटी अॅक्ट 69A नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला. परिणामी या बॅटल रॉयल गेमवर बंदी घालण्यात आली.
केवळ 90 दिवसांसाठी हटवलीय बंदी
आता जवळपास नऊ महिन्यांच्या बंदीनंतर बीजीएमआय गेमवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आलीय. मात्र गेम अद्याप पूर्णपणे परत आलेला नाही किंवा सुरू झालेला नाही. सरकारनं या गेमवरची केवळ 90 दिवसांची बंदी हटवलीय. या कालावधीत भारत सरकारची संबंधित एजन्सी या गेमिंग अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवेल. कोणत्याही प्रकारे कायद्याचं उल्लंघन तर होत नाही ना, याचा आढावा घेतला जाणार आहे. सर्व काही सुरळीत आणि ठीक झालं तर या गेमवरची बंदी पूर्णपणे उठवली जाईल.
भडकपणा कमी
गेमवरची बंदी उठवल्यानंतर कंपनीनं ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला होता. 19 मेला ट्विट केलेल्या या व्हिडिओत स्टे ट्यून फॉर मोअर, कमिंग सुन असं म्हटलं होतं. हा खरं तर एक टिझरच होता. पबजी किंवा त्याचं भारताचं व्हेरिएंट बीजीएमआय सुरुवातीला अॅग्रेसिव्हि होतं. सरकारला त्यात काही त्रुटी वाटल्यानं त्यावर बंदी घालण्यात आली. आता या खेळातला भडकपणा कमी केल्याचं दिसतंय. गेमची वेळही कमी करण्यात आलीय.