Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BGMI Return to India: 'बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया गेम'चा थरार पुन्हा सुरु होणार, केंद्र सरकारने BGMI वरील बंदी उठवली

BGMI

BGMI Return to India: बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BMGI) या गेमवरील निर्बंध केंद्र सरकारने हटवले आहेत. लवकरच BMGI भारतात पुन्हा सुरु होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.आक्रमक आणि युद्धाचे द्वंद दाखवणारा बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया हा तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय गेम आहे. वर्षभराच्या बंदीनंतर हा गेम पुन्हा सुरु होणार आहे.

बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BMGI) या गेमवरील निर्बंध केंद्र सरकारने हटवले आहेत. लवकरच BMGI भारतात पुन्हा सुरु होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.आक्रमक आणि युद्धाचे द्वंद दाखवणारा बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया हा तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय गेम आहे. वर्षभराच्या बंदीनंतर हा गेम पुन्हा सुरु होणार आहे. त्याबाबत बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाचे कंपनी क्राफ्टमन इंडियाने इन्स्टाग्रामवर एक टीझर रिलीज केला आहे.

बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाचा नवा अवतार हा थोडा सौम्य असल्याचे बोललो जाते. या गेममधील भडकपणा कंपनीने कमी केला आहे. त्याचबरोबर बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाचा गेमची वेळ देखील कमी केली आहे.  

भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर केंद्र सरकारने 300 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती.त्यात दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टमन कंपनीचा बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया या गेमवर बंदी घालण्यात आली होती.गेल्या वर्षी जुलै महिन्यात सरकारने बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया हे अॅप बंद केले होते. क्राफ्टमनसाठी हा मोठा धक्का होता.बॅटलग्राउंड मोबाइल गेमसाठी भारत ही क्राफ्टमनसाठी चीननंतर दुसरी मोठी बाजारपेठ आहे. 

पब्जी या मोबाईल गेमचा पुढचा अवतार म्हणून बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाकडे बघितले जाते. पब्जी हा चीनी कंपनी टेनसेंटचा मोबाईल गेम होता. मात्र चीनच्या 300 अॅपवर बंदी घातल्यानंतर क्राफ्टमनने पब्जीचे हक्क विकत घेतले. या गेमचा पुढला अवतार म्हणून बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया या गेम क्राफ्टमनने विकसित केला होता.या गेमचा भारतात जवळपास 100 मिलियन इन्स्टॉलेशन झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

क्राफ्टमनने बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया गेम कधी सुरु होणार याबाबत ठोस कोणती घोषणा केलेली नाही. मात्र लाखो युजर्स या गेमची वाट पाहत आहे. कंपनी भारतात मोबाईल गेम्सला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता नव्याने शेकडो कोटींची गुंतवणूक करणार आहे.