देशभरामध्ये दुचाकी गाड्यांची विक्री झपाट्याने वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यात दुचाकी विक्रीमध्ये 16.45% वाढ झाली. (Best-selling two-wheeler) यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण 12 लाख 36 हजार 190 दुचाकी विकल्या गेल्या याच काळात मागील वर्षी 10 लाख 61 हजार 493 गाड्यांची विक्री झाली. जगभरात मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतामध्येही महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीतही दुचाकींची विक्री वाढत असल्याने ही सकारात्मक बाब आहे.
हिरो कंपनीच्या दुचाकींची विक्री सर्वात जास्त होत असून त्यानंतर होंडा कंपनीच्या गाड्यांना मागणी आहे. तिसऱ्या क्रमांकावर टीव्हीएस दुचाकी आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स संघटनेने चालू वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील दुचाकी विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामधून ही माहिती समोर आली.
हिरो कंपनीची नंबर वन (Hero number one in two Wheller sale)
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हिरो कंपनीने 3 लाख 38 हजार 862 गाड्यांची विक्री केली होती. तर यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यात वाढ होऊन 3 लाख 79 हजार 747 गाड्यांची विक्री केली. मागील महिन्यात होंडा कंपनीच्या 3 लाख 53 हजार 553 गाड्या विकल्या गेल्या तर टीव्हीएस कंपनीच्या 1 लाख 91 हजार 730 गाड्या विकल्या गेल्या. तर मागील वर्षी 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात होंडा कंपनीने 2 लाख 56 हजार 174 तर टीव्हीएस कंपनीने 1 लाख 75 हजार 940 गाड्यांची विक्री केली होती.
Image source - www.drivespark.com
बजाज कंपनीच्या गाड्यांची विक्री घटली (Bajaj two-wheeler sales dropped)
मागील वर्षीच्या तुलनेत बजाज कंपनीची विक्री घटली आहे. चालू वर्षी नोव्हेंबर महिन्यात बजाज कंपनीच्या 1 लाख 23 हजार 490 गाड्यांची विक्री झाली. याच काळात 2021 मध्ये 1 लाख 44 हजार 953 गाड्यांची विक्री झाली होती. रॉयल एनफिल्ड कंपनीच्या 65 हजार 760 गाड्या विकल्या गेल्या तर सुझुकी कंपनीच्या 63 हजार 156 गाड्यांची विक्री झाली. त्याखालोखाल यामाहा कंपनीच्या सुमारे 42 हजार गाड्यांची विक्री झाली.
प्रिमीयम टु-व्हीलर गाड्यांची विक्री (Premium two-wheeler sales)
नोव्हेंबर महिन्यात कावासाकीच्या 330 महागड्या दुचाकींची विक्री झाली. तर ब्रिटिनच्या मार्क्यू ट्रम्फ कंपनीच्या 92 गाड्यांची विक्री झाली.