Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best PM Survey मध्ये लोकांनी दिली 'या' पंतप्रधानांना सर्वाधिक पसंती, जाणून घेण्यासाठी वाचा

Best PM in india

Best PM Survey: इंडिया टुडेने आजपर्यंतचे लोकप्रिय पंतप्रधान, लोकप्रिय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण? यावर ऑगस्ट 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत एक सर्वे केला होता. या सर्वेनुसार लोकांची पसंती कोणाला आहे हे जाणून घ्या

Best PM Survey:  भारतासह परदेशातही पंतप्रधान नरेंद्र मोदींना(PM. Narendra Modi) लोकप्रियता मिळत आहे. अनेकदा भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचा दावा केला जातो. इंडिया टुडेने(India Today) यासंदर्भातील  एक सर्वे केला आहे. ज्यामध्ये  भारतातील आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांपैकी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? हे जाणून घेतले आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल आणि देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? हे देखील या सर्वेतून पुढे आले आहे. हा सर्वे ऑगस्ट 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत करण्यात आला आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील आजपर्यंतचे लोकप्रिय पंतप्रधान कोण?

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने(India Today and Sea Voters) केलेल्या सर्वेतून 47 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना(Narendra Modi) आतापर्यंतचे लोकप्रिय पंतप्रधान म्हटले आहे. तर 16 टक्के लोकांनी अटलबिहारी वाजपेयींना(Atal Bihari Vajpayee) आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हटले आहे. याशिवाय 12 टक्के लोकांनी इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांना तर उर्वरित 8 टक्के लोकांनी मनमोहन सिंग(Manmohan Singh) यांना लोकप्रिय पंतप्रधान म्हटले आहे. केवळ 4 टक्के लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरू(Pandit Nehru) यांना लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे मत नोंदवले आहे.

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? यावर 39.01 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांना निवडले आहे. तर या सर्वेक्षणात अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 16 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हटले आहे.

नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण होणार?

पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण होईल या प्रश्नावर या सर्वेक्षणात 26 टक्के लोकांनी अमित शाह(Amit Shah) यांना आपली पसंती दर्शवली आहे. त्यासोबत योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनाही 25 टक्के लोकांची पसंती पाहायला मिळाली आहे. तर 16 टक्के लोकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांना पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे.