भारतीय म्युच्युअल फंड मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (International Mutual Fund) शिवाय परदेशातील मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे फंड ही आहेत. पण विशेष करून कोरोनाच्या काळात इक्विटी आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (इंटरनॅशनल फंड) कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. विशेष करून दीर्घकालीन मुदतीत या फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. परताव्याच्या बाबतीत या कॅटेगरीतील अनेक योजना या टॉप फंडांमध्ये समाविष्ट आहेत. इंटरनॅशनल फंड किंवा ओव्हरसीज फंड (Overseas Mutual Funds) हे आंतरराष्ट्रीय इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणून तुमचा पोर्टफोलिओ संतुलित ठेवायचा असेल, तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडाचा समावेश करू शकता.
आंतरराष्ट्रीय फंड म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय फंड (इंटरनॅशनल फंड किंवा ओव्हरसीज फंड) हे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये (International Market) गुंतवणूक करतात. हे फंड विशेषकरून इक्विटी किंवा डेब्टमध्ये (Equity & Debt) गुंतवणूक करतात. तसेच कमोडिटीज, रिअल इस्टेट आदी इतर मालमत्तांमध्येही गुंतवणूक करतात. सेबी (SEBI)च्या नियमांनुसार, जे म्युच्युअल फंड इतर देशांच्या इक्विटी किंवा इक्विटी मार्केटशी संबंधित मालमत्तांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक करतात, त्या फंडांना आंतरराष्ट्रीय फंड (International Fund) म्हणतात.
आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड कसा निवडावा?
1. सर्वप्रथम संबंधित आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड हाऊसचा आणि फंडचा रेकॉर्ड चेक करणे आवश्यक आहे.
2. तसेच त्या फंडचा फंड मॅनेजरचा रेकॉर्डही तपासणे गरजेचे आहे. तसेच त्या फंड मॅनेजरला अनुभव किती आहे, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरू शकते.
3. तुम्ही निवडलेली योजना ही तुमच्या फोर्टफोलिओची गरज पूर्ण करू शकते का? याचा आढावा घ्या.
4. आंतरराष्ट्रीय फंडमध्ये गुंतवणूक करताना त्यावर किती खर्च होऊ शकतो, हे जाणून घेण्यासाठी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
5. तुम्ही ज्या आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार आहात. त्या देशात अतिरिक्त टॅक्स आकारला जाणार नाही ना याची खात्री करून घ्या. जेणेकरून तुम्हाला दोनदा टॅक्स भरावा लागणार नाही.
source : https://kuvera.in/blog/best-international-mutual-funds/
आंतरराष्ट्रीय फंडमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा
तुम्ही कोणत्याही देशाच्या इक्विटी मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील, तर त्या देशातील नकारात्मक समस्येमुळे तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, पैसे गुंतवण्यापूर्वी, फंडाशी संबंधित त्या देशातील जोखमीची माहिती गोळा करा. तसेच चलनाच्या चढ-उताराचाही याच्या परताव्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर रुपया मजबूत झाला, तर या फंडांचा परतावा कमी होऊ शकतो. तर दुसरीकडे रुपयाच्या कमजोरीमुळे त्यांचा परतावा वाढू शकतो. तसेच या फंडमध्ये तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्यावरील भांडवली नफ्यावर टॅक्स लागू शकतो.