Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सर्वोत्तम इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या

सर्वोत्तम इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या

Best Equity Mutual Fund : 2022 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडाचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारे, अद्ययावत एनएव्हीसह, चांगली कामगिरी करणाऱ्या भारतातील सर्वोत्तम इक्विटी फंड पाहणार आहोत.

Best Equity Mutual Fund : 2022 या वर्षात गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंडाचा तुम्ही विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारे, अद्ययावत एनएव्हीसह, चांगली कामगिरी करणाऱ्या भारतातील सर्वोत्तम इक्विटी फंड पाहणार आहोत. इक्विटी फंड हा असा म्युच्युअल फंड प्रकार आहे; जे प्रामुख्याने फक्त इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. सेबीच्या (SEBI) नियमानुसार, जे फंड त्याच्या एकूण मालमत्तेपैकी किमान 65 टक्के गुंतवणूक ही फक्त इक्विटी मार्केट आणि त्याच्याशी संबंधित इतर उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतात, त्याला इक्विटी फंड म्हणतात. इक्विटी म्युच्युअल फंड हे डेब्ट आणि हायब्रीड फंडपेक्षा अधिक जोखीमयुक्त असतात. पण त्याचबरोबर ते डेब्ट आणि हायब्रीड फंडपेक्षा अधिक परतावा ही देतात.

इक्विटी फंडाचे वर्गीकरण

बाजारातील चढउताराचा इक्विटी म्युच्युअल फंडावर परिणाम होत असतो. पण सर्वोत्तम इक्विटी म्युच्युअल फंड हे योग्यप्रकारे व्यवस्थापित केले जाऊ शकतात. इक्विटी म्युच्युअल फंडाचे बाजारातील भांडवल, गुंतवणूक शैली आणि गुंतवणुकीच्या वैविध्यानुसार वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते. बाजारातील भांडवलावर आधारित, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप फंड असे वर्गीकरण केले जाते. इक्विटी फंडांची दुसरा प्रकार म्हणजे सेक्टरनुसार फंडाची विभागणी, जसे की, काही फंड एफएमसीजी (Fast-moving consumer goods) किंवा बॅंकिंग (Banking) क्षेत्रात गुंतवणूक करतात. तसेच काही फंड परदेशातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे असतात. त्यांना आंतरराष्ट्रीय फंड (International Fund) म्हणतात. इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्किम (ELSS) देखील इक्विटी म्युच्युअल फंड अंतर्गत येतात. हे फंड त्यांच्या मालमत्तेपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक इक्विटी मार्केटमध्ये करतात. इक्विटी फंडामध्ये केलेली गुंतवणूक ही 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र असते.

गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घेण्याच्या गोष्टी

इक्विटी म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यामुळे ते अस्थिर आणि उच्च जोखीमयुक्त असतात. म्हणून, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये  गुंतवणूक करताना त्या फंडचे उद्दिष्ट, फंडचा प्रकार, तुम्ही करत असलेल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट, गुंतवणुकीचा स्तर, जोखीम आणि त्यासाठी येणारा खर्च या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

2022 मध्ये गुंतवणूक करण्यासाठी टॉप 10 इक्विटी म्युच्युअल फंड

  1. अॅक्सिस ब्लूचिप फंड (Axis Bluechip Fund)
  2. मिराई अॅसेट लार्ज कॅप फंड (Mirae Asset Large Cap Fund)
  3. निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड (Nippon India Growth Fund)
  4. अॅक्सिस मिडकॅप फंड (Axis Midcap Fund)
  5. युटीआय निफ्टी इंडेक्स फंड (UTI Nifty Index Fund)
  6. एचडीएफसी इंडेक्स निफ्टी 50 फंड (HDFC Index Nifty 50 fund)
  7. पराग पारेख फ्लेक्सी कॅप फंड (Parag Parikh Flexi Cap fund)
  8. इन्वेस्को इंडिया ग्रोथ अपॉर्च्युनिटीज फंड (Invesco India Growth Opportunities Fund)
  9. मिराई अॅसेट टॅक्स सेव्हर फंड (Mirae Asset Tax Saver Fund)
  10. कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्ससेव्हर फंड (Canara Robeco Equity Taxsaver fund)
    स्त्रोत : स्क्रिपबॉक्स संकेतस्थळ

कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. अपुऱ्या माहितीवर आधारित केलेली गुंतवणूक तुम्हाल जोखमीत टाकू शकते.

Image Source - https://www.indiamart.com/proddetail/equity-mutual-funds-service-23510804191.html