Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे हे आहेत फायदे!

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे हे आहेत फायदे!

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अधिक परतावा मिळवून देणारी सुरक्षित गुंतवणूक समजली जाते; तसेच सर्वसामान्य व्यक्ती दरमहा 500 रूपयांपासून यात गुंतवणूक करू शकतो.

गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या सरकारी बचत योजनांसोबतच शेअर (Shares), सोनं (Gold), स्थावर मालमत्ता (Real Estate), पोस्टाच्या विविध योजना आणि म्युच्युअल फंड असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व पर्यायांमध्ये सध्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे आहे. गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा म्युच्युअल फंडचे काही विशेष फायदे आहेत. हे फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

MUTUAL FUND INVESTMENT BENEFITS

सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) गुंतवणूक (Investment) करणे अत्यंत सोपे आहे. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार, पैशांच्या उपलब्धतेनुसार आणि स्वत:च्या सोयीनुसार फंड निवडता येतो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फंड देखील उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडचे प्रामुख्याने इक्विटी (equity), डेट (debt) आणि  हायब्रीड (Hybrid) असे तीन गटात म्युच्युअल फंड्सचे वर्गीकरण केले जाते. याशिवाय ज्यांना पारंपरिक पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी गोल्ड फंड उपलब्ध आहेत. टॅक्स बचतीसाठीही म्युच्युअल फंडचे काही विशेष फंड आहेत.

मुदत कालावधी, लाभांश, उद्दिष्ट अशा विविध निकषांवर आधारित म्युच्युअल फंड उपलब्ध असल्याने प्रत्येक गुंतवणूकदाराला आपली गरज आणि अपेक्षेनुसार गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य मिळते. अशाचप्रकारचे आणखी काही फायदे आपण इथे पाहणार आहोत.

फंड मॅनेजरद्वारे व्यावसायिक व्यवस्थापन 

म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवलेल्या पैशांचे व्यवस्थापन, तज्ज्ञ व्यक्तींमार्फत म्हणजे फंड मॅनेजर्सद्वारे बाजारात अधिकाधिक परतावा मिळावा या उद्देशाने केले जाते. प्रत्येक गुंतवणूकदाराला शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीबद्दल माहिती किंवा ज्ञान असतेच असे नाही. तसेच त्याला त्याचा अभ्यास करण्यासही इतका वेळ नसतो. अशावेळी फंड मॅनेजर्सच्या व्यावसायिक व्यवस्थापनाचा गुंतवणूकदारांना फायदा होतो.

वैविध्यामुळे जोखीम कमी 

सुरक्षित गुंतवणुकीचा मूलमंत्र म्हणजे आपला पैसा एका ठिकाणी गुंतवण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी आणि विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्याने त्यातील रिस्क कमी होते आणि परतावा अधिक मिळण्याचे प्रमाण वाढते. म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवलेले पैसे हे वेगवेगळ्या कंपन्यांसोबतच इतर क्षेत्रांमध्ये ही गुंतवले जातात. जे गुंतवणूकदारांना अधिक संरक्षण देतात.

भरपूर पर्याय उपलब्ध 

आजच्या घडीला म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीसाठी फंड आहेत. ज्यांना अधिकाधिक रिटर्न्स हवा आहे, त्यांच्यासाठी अधिक रिटर्न देणारे फंड आहेत. तसेच ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुरक्षित फंडस् उपलब्ध आहेत.

टॅक्स सवलत 

म्युच्युअल फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर टॅक्स बचतीचा फायदा मिळतो. जो शेअर्स, बॅंक ठेवी यावर मिळत नाही. टॅक्स बचतीसाठी ईएलएसएस (ELSS) म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममुळे टॅक्स बचत आणि चांगले रिटर्न असा दोन्हीप्रकारे लाभ होतो.

100 रूपयांपासून गुंतवणुकीची सोय 

म्युच्युअल फंडमध्ये कमीतकमी अगदी 500 रूपयांपासून गुंतवणूक करता येते. काही विशिष्ट फंडमध्ये 100 रूपयांपासूनही गुंतवणूक करता येते. प्रत्येक महिन्याला एसआयपी (Systematic Investment Plan)द्वारे ठराविक रक्कम गुंतवण्याची सोय ही उपलब्ध आहे.

पारदर्शकता आणि फ्लेक्झिबिलिटी 

पारदर्शकता (Transperancy) आणि लवचिकता (Flexibilty) ही म्युच्युअल फंडची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. म्युच्युअल फंडवर सेबीचे (SEBI) नियंत्रण असते. त्यामुळे सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता असते व गुंतवणूक सुरक्षित असते. गुंतवणूकदाराचे पैसे कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवले आहेत, खर्चाचा अधिभार, बाजार भावाप्रमाणे मिळणारे युनिट्स अशी सर्व माहिती गुंतवणूकदाराला मिळत असते.