Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर, अर्थमंत्री असे काही म्हणल्या की Budget 2023 विषयी निर्माण झाल्या मोठ्या आशा

Nirmala Sitharaman

Image Source : www.theprint.in.com

Budget 2023 मध्यमवर्गीयांसाठी कसा असेल, याची चर्चा सुरू असतेच. आता या चर्चेला आणखी एक कारण मिळालय याचे कारण म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एक विधान.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या,  'मी मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे मला त्यांच्या समस्या माहित आहेत.’ केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, मीही मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे मी मध्यमवर्गीयांच्या समस्या समजू शकते.सध्याच्या केंद्र सरकारने मध्यमवर्गावर कोणताही नवा कर लादला नसल्याची आठवणही  त्यांनी करून दिली.

अर्थसंकल्पात आयकर मर्यादा(Income Tax limit )वाढवणे अपेक्षित 

सीतारामन (Nirmala Sitharaman )1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2023-24 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सरकार आयकर मर्यादा वाढवेल आणि मध्यमवर्गीय करदात्यांना आणि इतरांना दिलासा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'पांचजन्य'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की, मीही मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे मी मध्यमवर्गीयांच्या समस्या समजू शकते. सध्याच्या केंद्र सरकारने मध्यमवर्गीयांवर कोणताही नवीन कर लादलेला नाही, याची आठवण मंत्र्यांनी यावेळी उपस्थित श्रोत्यांना करून दिली. ते म्हणाले की, पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न आयकरमुक्त आहे.

 सीतारामन म्हणाल्या की,  सरकारने 27 शहरांमध्ये मेट्रो रेल्वे नेटवर्क विकसित करणे आणि 100 स्मार्ट शहरे बनवणे यासारख्या अनेक उपाययोजना केल्या आहेत. मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढत असल्याने आणि ती आता प्रचंड झाली आहे. सरकार मध्यमवर्गासाठी आणखी काही करू शकते, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.
त्या म्हणाल्या, मला त्यांच्या (मध्यमवर्गीय) समस्या चांगल्या प्रकारे समजतात. सरकारने त्यांच्यासाठी खूप काही केले आहे आणि यापुढेही करत राहील. सीतारामन म्हणाल्या  की सरकार 2020 पासून प्रत्येक अर्थसंकल्पात भांडवली खर्चावरील खर्च वाढवत आहे.  चालू आर्थिक वर्षासाठी ते 35 टक्क्यांनी वाढवून 7.5 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.