Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning Tips: परदेशी फिरायला जाण्यापूर्वी 'या' आर्थिक बाबींकडे नीट लक्ष द्या

Financial Planning Tips for Foreign Tour

Financial Planning Tips: परदेशात फिरायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण पुरेसे कमवते झालो आणि चार पैसे साठवले की, ट्रॅव्हल कंपन्यांच्या मदतीने आपण परदेश दौरा करू शकतो. तुम्हीही परदेशात फिरायला जाणार असाल, तर त्यापूर्वी काही आर्थिक बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्या बाबी कोणत्या जाणून घेऊयात.

कोविडच्या महामारीचे संकट आता जवळपास दूर झाले आहे. त्यामुळे अनेक देशांनी आता पर्यटनाला पुन्हा एकदा चालना द्यायला सुरुवात केली आहे. परदेशात फिरायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण पुरेसे कमवते झालो आणि चार पैसे साठवले की, ट्रॅव्हल कंपन्यांच्या मदतीने आपण परदेश दौरा करू शकतो.

हल्ली बँकांकडून पर्सनल लोन अंतर्गत ट्रॅव्हल लोनही (Travel Loan) देण्यात येतंय. त्यामुळे परदेशात फिरायला जाणं तुलनेनं सोपं झालं आहे. मात्र परदेशात फिरायला जाण्यापूर्वी काही आर्थिक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या गोष्टी कोणत्या आजच्या लेखातून जाणून घेऊयात. 

परदेशी फिरायला जाण्यापूर्वी 'या' आर्थिक बाबींकडे लक्ष द्या

बजेट प्लॅन करा

तुम्ही परदेशी फिरायला जाणार असाल, तर तुमच्या टूरचे बजेट (Budget) ठरवणे गरजेचे आहे. त्या टूरसाठी नेमका किती खर्च येईल. याचे पूर्व नियोजन करण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल कंपन्यांसोबत बजेट या विषयावर सविस्तर चर्चा करू शकता. महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हल कंपनी कोणता खर्च कव्हर करणार आहे आणि कोणता नाही या गोष्टी जाणून घ्या. जो खर्च ट्रॅव्हल कंपनी कव्हर करणार नाही, त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. याशिवाय तुम्ही जितके दिवस त्या देशात राहणार आहात, त्यानुसार तुमचा इतर खर्चही होणार आहे. त्यामुळे त्या देशाच्या चलनानुसार तुम्हाला किती भारतीय रुपये जवळ ठेवावे लागतील याचे गणित पक्के डोक्यात ठेवावे लागेल आणि बजेट प्लॅन करावे लागेल. जर तुमचे बजेट चुकले तर तुम्हालाच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ट्रॅव्हल फंड तयार करा

फिरायला जाणं आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे आपल्या अनेक बचतींप्रमाणे फिरायला जाण्यासाठी सुद्धा एका ठराविक रक्कमेची बचत करा.या रकमेला आपण ट्रॅव्हल फंड (Travel Fund) असंही म्हणू शकतो. वर्षातून एक विदेशी टूर करायची असेल, तर आपल्याला महिन्याला ठराविक रक्कम ट्रॅव्हल फंडात सेव्ह करावी लागेल. याचा फायदा असा की, ऐनवेळी वर्षाच्या शेवटी आपल्याला एक मोठी रक्कम उपलब्ध होईल. जेणेकरून मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड

सध्या वेगवेगळ्या बँकांकडून ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड (Travel Credit Card) देण्यात येतं. या कार्डवर अनेक सुविधा दिल्या जातात. सध्या महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. साहजिकच प्रवासाचा खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत ट्रॅव्हल क्रेडिट कार्डचा वापर करून विमानाच्या तिकिटाचा खर्च, एअरपोर्ट लाउंजमधील सुविधा, हॉटेल्सचा खर्च किंवा ट्रॅव्हल इन्शुरन्स यासारख्या सुविधांचा लाभ सहज घेता येऊ शकतो.

ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड खरेदी करण्यापूर्वी मार्केटमधील बँका देत असलेल्या सेवांची एकमेकांशी तुलना करा. तुम्हाला आवश्यक असणाऱ्या आणि जास्तीत जास्त सुविधा देणाऱ्या कार्डची निवड करा. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही हे कार्ड घेऊन प्रवास करणार असाल, तर तुम्ही ज्या बँकेकडून कार्ड खरेदी करणार आहात, त्यांना तुमच्या प्रवासाच्या तारखांची कल्पना देऊन ठेवा. जेणेकरून तुम्ही त्या तारखांना कार्ड स्वॅप केल्यानंतर Transaction चा प्रॉब्लेम होणार नाही.  

ट्रॅव्हल इन्शुरन्स कव्हर

प्रवास छोटा असो किंवा मोठा ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance) हा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणताही प्रवास करण्यापूर्वी ट्रॅव्हल कंपनीकडून ट्रॅव्हल इन्शुरन्स आवर्जून घ्या. प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या इमर्जन्सीसाठी हा इन्शुरन्स कामी येतो. महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हल कंपन्यांच्या टूर पॅकेजमध्ये अगदी कमी किमतीत ट्रॅव्हल इन्शुरन्स देण्यात येतो. त्यांच्याकडूनच ही सेवा घेतल्याने यासंदर्भातील प्रक्रियाही त्यांनाच कराव्या लागतात, ज्याचा त्रास आपल्याला होत नाही.

या इन्शुरन्स अंतर्गत वैद्यकीय सेवा, सामानाची सुरक्षा आणि ट्रीपची बुकिंग ऐनवेळी रद्द झाली, तर त्याचा खर्च या इन्शुरन्स अंतर्गत कव्हर करण्यात येतो. याशिवाय प्रवासात काही अपघात घडला आणि त्यामध्ये प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबाला ठरावी रक्कम ट्रॅव्हल इन्शुरन्स अंतर्गत देण्यात येते.