Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Car: इलेक्ट्रीक कार घेण्याआधी काही गोष्टी नक्की पडताळून पाहा

Buying Electric Car

Buying Electric Car: भारतात इलेक्ट्रीक कार हळूहळू का होईना पण ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. तर आता 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रीक वाहनेही मोठ्या प्रमाणात येत आहेत. तुम्ही सुध्दा स्वत:साठी नवीन इलेक्ट्रीक कार घेण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी काही गोष्टींचा विचार नक्की करा.

Electric Car Facts Check: पेट्रोल-डिझेलचे वाढत असलेले भाव, पर्यावरणाच्या समस्या आणि इतरही अनेक गोष्टींमुळे नागरिक हळूहळू का होईना इलेक्ट्रीक वाहनांकडे वळत आहेत.  कोणतेही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी, त्याची किंमत, बॅटरी, श्रेणी, वॉरंटी आणि चार्जिंगची वेळ तसेच रनिंग कॉस्ट, देखभाल खर्च, सबसिडी आणि इत्यादी सर्व गोष्टीं जाणून घेणे आवश्यक आहे, या गोष्टी पूढे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. आज आपण इलेक्ट्रीक कार विकत घेतांना कोणत्या गाईडलाइन फॉलो करायला पाहिजे, याबाबत जाणून घेऊया.

हायब्रीड कार की पूर्णपणे इलेक्ट्रिक कार?

सगळ्यात आधी तुमच्या मनात ठरवा की, तुम्हाला इलेक्ट्रिक कार हवी आहे की हायब्रीड कार? खरं तर, आजच्या काळात हायब्रीड कारची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. पूर्णपणे इलेक्ट्रिक कार बॅटरीवर चालतात, तर हायब्रीड कार आइस इंजिन तसेच बॅटरीच्या संयोजनावर चालतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला डिझेल किंवा पेट्रोलचा खर्च वाचवायचा असेल, तर तुमच्यासाठी पूर्ण इलेक्ट्रिक कार खरेदी करणे चांगले ठरेल.

बँटरीची श्रेणी आणि वेग म्हणजे काय?

इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत नक्कीच महाग आहेत. चांगल्या कारसाठी तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. टाटा मोटर्स, एमजी, महिंद्रा, ह्युंदाई, बीवायडी आणि इतर लक्झरी कंपन्यांच्या मिड रेंज आणि प्रीमियम कारसाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागतील. तसेच कार खरेदी करतांना इलेक्ट्रिक कारवरील कर, फेम 2 सबसिडी आणि राज्य ईव्ही सबसिडी याबद्दल देखील जाणून घ्या. आता बॅटरी रेंज आणि टॉप स्पीडचा प्रश्न येतो, तर  कार खरेदी करणार आहात, ती एकदा फुल चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर धावू शकते आणि तिचा वेग किती चांगला आहे, ते एकदा पडताळून पाहा.

वारंटी आणि देखभाल खर्च

कोणतीही इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी त्याच्या बॅटरीवर किती वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे हे नक्की पहा. साधारणपणे, कार कंपन्या इलेक्ट्रिक कार आणि बॅटरीवर 5  ते 8 वर्षांची वॉरंटी देतात. त्यानंतर त्याच्या देखभाल आणि चालवण्याच्या खर्चावर किती खर्च केला जाईल. या सगळ्या दरम्यान, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार्जिंग स्टेशन्स आणि फास्ट चार्जिंग पॉइंट्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.