‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते’ असे आपण लहानपणापासून ऐकले आहे. पण ‘ज्ञान दिल्याने पैसे वाढतात’ असे तुम्ही कधी ऐकले आहे का? आपल्या दैनंदिन आयुष्यात पैसा हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच पैशा संदर्भातील अनेक आर्थिक व्यवहार आपण दररोज करत असतो. त्यामुळे आपल्याला अर्थसाक्षर (Financial literacy) होणं गरजेचे आहे.
आपल्या दररोजच्या जीवनशैलीत केलेले छोटे बदल देखील मोठा परिणाम घडवून आणू शकतात. त्यामुळे तुमच्या पैशात वाढ होऊ शकतो. तुमची बचत होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, हे बदल कोणते आहेत? त्यासाठी काय करायचे? तर उत्तर सोपे आहे. फार काही नाही; पर्सनल फायनान्सवरील (Personal Finance) काही पुस्तके तुम्ही वाचून अर्थसाक्षर होण्यासोबतच श्रीमंतीचा मंत्रही मिळवू शकता.
Table of contents [Show]
पर्सनल फायनान्सचे धडे देणारी ही पुस्तके नक्की वाचा!
रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad)
रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेले ‘रिच डॅड पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad) हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. रॉबर्ट कियोसाकी यांच्या जीवनावर आधारित असलेले हे पुस्तक बेस्ट सेलिंग बुक म्हणून ओळखले जाते. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या दोन वडिलांबद्दल माहिती दिली आहे. ज्यापैकी एक त्यांचे वडील होते, तर दुसरे मित्राचे वडील होते. दोन्ही वडिलांकडून त्यांना मिळालेले आर्थिक ज्ञान त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. याशिवाय पैशांसंदर्भात अनेक सिद्धांत त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. ज्याचा वापर दैनंदिन आयुष्यात प्रत्येकाने करायला हवा. हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.
बेबीलॉन का सबसे अमीर आदमी (The Richest Man in Babylon)
पैशांवर लिहिलेले एक सर्वोत्तम पुस्तक म्हणून ‘बेबीलॉन का सबसे अमीर आदमी’ याकडे पाहिले जाते. यामध्ये बेबीलॉनच्या काळातील लोकांचे संपत्ती संदर्भातील विचार आणि नियम सांगण्यात आले आहेत. याशिवाय पैशांची बचत कशी करावी आणि त्याची गुंतवणूक कुठे आणि कशी करावी यासंदर्भात माहिती दिली आहे. फायनान्शियल फ्रीडम या महत्त्वाच्या मुद्द्याला या पुस्तकात कव्हर करण्यात आले आहे. या पुस्तकाचे मूळ इंग्रजी लेखक जॉर्ज. एस. क्लासन (George Samuel Clason) आहेत.
थिंक अॅण्ड ग्रो रिच (Think and Grow Rich)
लेखक नेपोलिअन हिल यांनी लिहिलेले ‘थिंक अॅण्ड ग्रो रिच’ (Think and Grow Rich) हे पुस्तक देखील प्रचंड लोकप्रिय आहे. महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकाचे हिंदीत भाषांतर उपलब्ध आहे. हिंदीमध्ये या पुस्तकाचे नाव ‘सोचिये और अमीर बनिये’ असे आहे. नेपोलियन हिल यांनी 22 वर्ष मेहनत घेऊन आणि 500 हून अधिक लोकांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात श्रीमंत होण्यासाठीचे 13 वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. ज्यामध्ये एखादी तीव्र ईच्छा कशाप्रकारे सत्यात उतरवता येऊ शकते, यावर भाष्य केले आहे.
सीक्रेट ऑफ मिलियनेअर माईंड (Secret of Millionaire Mind)
टी हार्व एकर या जगप्रसिद्ध लेखकाने लिहिलेले ‘सीक्रेट ऑफ मिलियनेअर माईंड’ (Secret of Millionaire Mind) हे पुस्तक बेस्ट सेलर बुक म्हणून ओळखले जाते. या पुस्तकात संपत्ती संदर्भात 17 सिद्धांत मांडण्यात आले आहेत. या सिद्धांताचा वापर करून तुम्ही पैशांसंदर्भातील माईंडसेट बदलू शकता. याशिवाय यामध्ये गरीब आणि श्रीमंत लोकांच्या आर्थिक मानसिकतेबद्दल लिहिण्यात आले आहे. गरीब लोक गरीब का असतात आणि श्रीमंत लोक श्रीमंत का होतात? यावर मुद्देसूद लिखाण करण्यात आले आहे.
मनी मास्टर द गेम (Money Master the Game)
फायनान्शियल फ्रीडम (Financial Freedom) मिळवण्यासाठी काय करायला हवे, हे केवळ 7 टप्प्यामध्ये समजून सांगणारे ‘मनी मास्टर दी गेम’ (Money Master The Game) हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवे. या पुस्तकाचे लेखक टोनी रॉबिंस हे बेस्ट रायटर (Tony Robbins Best Writer) म्हणून ओळखले जातात. या पुस्तकात लेखकाने आर्थिक तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन फायनान्शियल फ्रीडमबद्दल माहिती दिली आहे. साध्या आणि सोप्या भाषेत केलेले लिखाण आणि आर्थिक स्वातंत्र्याबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे हे पुस्तक लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.
News Source: www.aapkisafalta.com