Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BGMI चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, या वर्षी गेम परत येतोय

BGMI

BGMI : क्राफ्टन कंपनीने हा गेम विकसित केला आहे. कंपनी BGMI परत आणण्यासाठी सरकारशी चर्चा करत आहे. काही गेमिंग कंटेन्ट निर्मात्यांनी दावा केला आहे की BGMI याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये Google Play-Store वर परत येईल.

क्राफ्टन कंपनीने हा गेम विकसित केला आहे. कंपनी  BGMI परत आणण्यासाठी सरकारशी चर्चा करत आहे. काही गेमिंग कंटेन्ट  निर्मात्यांनी दावा केला आहे की BGMI याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये Google Play-Store वर परत येईल.

जर तुम्ही बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात गेल्या वर्षाच्या सुरुवातीला बीजीएमआयवर (BGMI) बंदी घालण्यात आली होती. याआधी 2020 मध्ये भारत सरकारने PUBG मोबाईल गेमवर बंदी घातली होती. आता बातमी अशी आहे की बीजीएमआय लवकरच परतणार आहे. रिपोर्टनुसार, हा गेम विकसित करणारी कंपनी क्राफ्टन बीजीएमआय परत करण्यासाठी सरकारशी चर्चा करत आहे. काही गेमिंग कंटेन्ट  निर्मात्यांनी दावा केला आहे की BGMI पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये Google Play-Store वर परत येईल. AFKGaming चा दावा आहे की BGMI लवकरच परत येईल.

दुसर्‍या निर्मात्याने दावा केला आहे की BGMI 15 जानेवारी रोजी Google Play Store वर परत येईल.  मात्र  Google आणि गेम विकसित करणार्‍या कंपनीने अद्याप BGMI परत करण्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

2020 मध्ये टिकटॉक मोबाइलवर बंदी 

2020 मध्ये, PUBG मोबाइल गेमवर टिकटॉकसह भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर PUBG गेम BGMI या नावाने भारतात परत आला. टिकटॉकबद्दल बोलायचे झाले तर अमेरिकेत नुकतीच बंदी घालण्यात आली होती आणि याआधी पाकिस्तानमध्येही अनेक वेळा टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे.