IBC Battery plant in India: इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये भारतात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. इंटरनॅशनल बॅटरी कंपनी (IBC) भारतामध्ये 1 बिलियन डॉलरचा प्रकल्प उभारणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रामुख्याने बॅटरीचा पुरवठा या कंपनीकडून केला जाईल.
कर्नाटकात 100 एकर जागा खरेदी
'लिथियम आयन सेल बॅटरी निर्मितीची भारताला गरज भासत आहे. कार इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. सध्या इव्ही बॅटरी मोठ्या प्रमाणात परदेशातून आयात केल्या जातात. भारतामध्ये बॅटरी निर्मितीचे प्रकल्प वाढल्यास इव्ही गाड्यांच्या किंमतीही खाली येतील. बंगळुरू टेक्नॉलॉजी हबजवळ कंपनीने 100 एकर जागा खरेदी केली आहे. तेथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेने यासंदर्भात बातमी दिली आहे.
कोरियात पायलट प्रकल्प सुरू
IBC कंपनीकडून नवीन तंत्रज्ञानावर आधारित Prismatic cells बॅटरी निर्मितीचा प्रकल्प दक्षिण कोरियामध्ये सुरू करण्यात आला आहे. तर अमेरिकेमध्ये संशोधन केले जाते. भारतामध्ये सर्वात मोठा निर्मिती प्रकल्प सुरू होणार आहे. परदेशातही बॅटरी निर्यात केल्या जातील. बॅटरी पुरवठ्याचे महत्त्वाचे केंद्र म्हणून कंपनी भारताकडे पाहत आहे.
10 गिगावॅट निर्मिती क्षमता
2025 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन निर्मिती सुरू होईल. कर्नाटक सरकारकडून कंपनीला सवलती दिल्या जाणार आहेत. 2028 पर्यंत या प्रकल्पाची क्षमता 10 गिगावॅट इतकी केली जाणार आहे. Prismatic batteries इव्ही गाड्यांमध्ये वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. वाहनात कमी जागेत ही बॅटरी बसते. तसेच या बॅटरीची कार्यक्षमताही जास्त असते.