पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अनेकदा भावनेच्या भरात गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधील रिस्क आणि चुकांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. सुरुवातीलाच मोठ्या चूका केल्या तर गुंतवणुकांमुळे संपत्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ठप्प होऊ शकते. तुमच्या आर्थिक फायद्यात भर पडण्याऐवजी पैशांचे नुकसान होऊ शकते.
Table of contents [Show]
पुरेशा माहितीअभावी गुंतवणूक करणे
बहुतेक गुंतवणूकदार गुंतवणूकीचे निर्णय घेण्यासाठी वेळ देण्यासोबत सखोलपणे माहिती जाणून घेतात. पण सर्वच करतात असे नाही.प्रथमच गुंतवणूक करणारे सहसा त्यांचा प्रवास सुरू करण्यास खूप उत्सुक असतात. नियोजन आणि संशोधनाच्या अभावामुळे घाईघाईने निर्णय घेतल्यास नुकसानही होऊ शकते.गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी,कंपनीचे व्यवसाय मॉडेल व मागील कामगिरीचे सखोल विश्लेषण व माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.ज्यामुळे तुम्हाला व्यवसायामध्ये भरभराट होत आहे की नाही हे समजेल आणि गुंतवणूकीसंदर्भात निर्णय घेणे सुलभ होईल.तुम्हाला त्यांच्या विकासाच्या क्षमतेबद्दल देखील सखोल माहिती मिळेल.
ट्रेण्ड्ससोबत जाण्यापूर्वी विचार करा
अनेकदा गुंतवणूकदार बाजारपेठेतील ट्रेण्डिंग स्टॉक्सकडे प्रभावित होतात. तसेच सोशल मीडियावर वैयक्तिक पूर्वाग्रह निर्माण होत आताच्या व भावी विशिष्ट उद्योगक्षेत्र किंवा स्टॉकप्रती कल वाढतो. योग्य संशोधन केल्याशिवाय फक्त ऐकलेल्या गोष्टींच्या आधारावर गुंतवणूक करण्याचा निर्णय अयोग्य ठरू शकतो. प्रत्येक ट्रेण्डिंग माहितीसंदर्भात संसाधन ओळखण्याचा प्रयत्न करा आणि योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी स्वत:हून संशोधन करा.
गुंतवणूक ध्येयांबाबत संभ्रम असणे
अंतिम ध्येय निश्चित केल्याशिवाय गुंतवणूकीला सुरुवात करणे चुकीचे ठरू शकते.यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याऐवजी सर्व गुंतवणूक कमी होऊ शकते.म्हणून तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा आर्थिक बाजारपेठेत गुंतवणूक सुरू करण्याचे नियोजन करत असाल तर पहिली पायरी आर्थिक ध्येय स्थापित करण्याबाबत आहे,जे तुम्ही विशिष्ट कालावधीमध्ये संपादित करू इच्छिता. पुढील पायरी म्हणजे जोखीम सहनशीलता निश्चित करणे.तुम्ही संपादित करावयाचे ध्येय स्थापित केल्यानंतर तुम्हाला कोणत्या मालमत्तावर्गामध्ये गुंतवणूक करावी याबाबत उत्तमप्रकारे नियोजन करण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, इक्विटीजमध्ये अल्पकाळासाठी उच्च अस्थिरता असते,पण दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवल्यास इतर मालमत्तावर्गांना मागे टाकू शकतात.म्हणूनच अधिकतम परतावे मिळवण्यासाठी गुंतवणूक ध्येये स्थापित करण्याची खात्री घ्या.
गुंतवणूक पोर्टफोलिओंची विभागणी न करणे
बहुतेक नवीन गुंतवणूकदारांकडून दुर्लक्ष केली जाणारी सर्वात मोठी बाब म्हणजे गुंतवणूक पोर्टफोलिओची विभागणी.बहुतेक अनुभवी गुंतवणूकदार विविध मालमत्तावर्गांमध्ये त्यांच्या फंड्सचे वितरण करतात, तर बाजारपेठेमध्ये नवीनच असलेले गुंतवणूकदार असे करण्यास अयशस्वी ठरतात. पण आर्थिक बाजारपेठांमध्ये वैविध्यतेच्या सिद्धांताशी जुळून राहणे नेहमीच उत्तम आहे.वैविध्यपूर्ण पोर्टपोलिओ नुकसानांच्या जोखीम कमी होण्यामध्ये मदत करतो. एखाद्या गुंतवणूकीमध्ये नुकसान झाले तर त्याचा तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओवर परिणाम होत नाही.म्हणून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करा.
त्वरित रिझल्टची अपेक्षा ठेवू नका
बहुतेक लोक गुंतवणूकांमधून त्वरित परतावे मिळण्याची अपेक्षा करतात आणि अल्पावधीत काहीच वाढ दिसली नाही तर ते त्यामधून माघार घेतात.पण आर्थिक बाजारपेठांमध्ये याचा काहीच अर्थ नाही.गुंतवणूक ही क्रमिक प्रक्रिया आहे आणि कधी-कधी कोणतेही अर्थपूर्ण परतावे मिळण्यासाठी अपेक्षित काळापेक्षाही अधिक वेळ लागतो. स्टॉक्समधील वाढ कंपनीच्या व्यवसाय कामगिरीवर अवलंबून असते आणि म्हणून आवश्यक परतावे दिसण्यासाठी अपेक्षितपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. म्हणूनच, गुंतवणूक करताना वास्तववादी अपेक्षा असणे महत्त्वाचे आहे.
गुंतवणुकीच्या प्रवासाचा सुरुवातीला चुका होण्याची शक्यता असते. गुंतवणूक प्रवासाचाच हा एक भाग आहे. पण त्या चुका काय आहेत हे जाणून घेणे व टाळणे हा नुकसान कमी करण्याचा आणि लाभ मिळण्याच्या शक्यतांमध्ये वाढ होण्याचा उत्तम मार्ग आहे.