भारतीय सणासुदीच्या काळात सोन्यात गुंतवणूक करून आपल्या गुंतवणुकीची माध्यमे वाढवण्याचा प्रयत्न करतात. लग्न आणि मुलाच्या जन्माच्या वेळी अशा विविध विशेष निमित्ताने सोने खरेदी केली जाते. सोने ही रिअल इस्टेटसारखी एक प्रत्यक्ष मालमत्ता असली तरी वित्तीय किंवा डिजिटल गुंतवणूक मालमत्तांद्वारे त्याची चमक कमी होत नाही. सोन्यातील गुंतवणूक उत्तमरित्या केली जात असून ती चांगल्या कारणांसाठी आहे.
Table of contents [Show]
चलनवाढीला फायदा
सोने हे प्राथमिक साधन असून वाढत्या किंमतीसह ते अधिकाधिक महागडे होत जाते. त्यामुळे चलनवाढ सुरू असलेल्या अर्थव्यवस्थेत आकर्षक परतावे मिळतात.
देवाणघेवाण करता येण्याजोगे
सोने हे एक स्वतंत्र चलन आहे. तुमच्याकडे स्वीकारार्ह चलन हातात नसतानाही सोने अनेक प्रकारच्या वस्तूंसाठी वापरले जाऊ शकते. यामुळे चलन कोसळते किंवा ते उपयोगात येत नाही तेव्हा याचा अधिक फायदा होतो.
मर्यादित पुरवठा
सोने हा मौल्यवान आणि दुर्मिळ धातू आहे. भविष्यात सोने आणखी उपलब्ध होण्याची शक्यता मर्यादित असल्याने ते आणखी मौल्यवान होत जाईल. त्याशिवाय सोने कृत्रिमरित्या उत्पादित केले जाऊ शकत नाही. कमी पुरवठा आणि जास्त मागणी यांच्यामुळे कायमच किंमत वाढली आहे आणि त्यामुळे सोन्याची गुंतवणूक दीर्घकालीन मालमत्ता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरते आहे.
अत्यंत लवचिक आणि रोखता उपलब्ध करणारे साधन
आपण सहजपणे सोन्याचा साठा खरेदी आणि विक्री करू शकतो. त्यामुळे ती एक अत्यंत लवचिक आणि रोख गुंतवणूक ठरते. अर्ध्या रात्री पैशांची गरज भासल्यास सोने तुम्हाला उपयोगी पडू शकते. सोने विक्री केल्यास तात्काळ पैसे मिळतात.
उपयुक्तता
सोन्याचा वापर विविध उद्योगांमध्ये होतो जसे स्पेस इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स. हे सर्व उपयोग मोठे फायदे देणारे उद्योगातील आहे. यातून सोन्याला कायमच मागणी राहील याची खात्री मिळते. तसेच, सोने दागिन्यांच्या स्वरूपातही वापरता येते.
अनिश्तित काळात पुरवते सुरक्षा
समभाग बाजारपेठेत मोठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोने हे शेअर बाजार कोसळतो तेव्हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून वापरता येते. सोन्यातील गुंतवणूक कोसळणाऱ्या बाजारपेठांमध्ये अधिक चांगली कामगिरी करतात असे दिसून आले आहे.
सोने खरेदी करण्याच्या विविध पद्धती आहेत. यात सराफांकडून सोने खरेदी करता येते. त्याशिवाय गोल्ड ईटीएफमधूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करता येते.
प्रत्यक्ष सोने खरेदी करणे
गोल्ड बुलियन किंवा नाणे ही सोने खरेदी करण्याची एक पद्धत आहे. परंतु सोने हरवण्याच्या किंवा चोरीला जाण्याच्या भीतीसह ही गुंतवणूक येते. त्याचबरोबर तुम्हाला पुरेशा साठवणुकीचीही गरज भासेल.
गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स
गोल्ड ईटीएफ शेअर बाजारात नोंदणीकृत आहे आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ते खरेदी करून विकता येते. गोल्ड ईटीएफ गुंतवणुकांमध्ये 99.95% शुद्धता आहे, जी 0.5 ते 1 किलो गोल्ड युनिट्सपर्यंत पोहोचल्यावर प्रत्यक्ष मालमत्तांमध्येही रूपांतरित करता येते.
गोल्ड फंड्स
गोल्ड म्युच्युअल फंड ही एक अशी योजना आहे, जी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करते आणि परतावे निश्चित करण्यासाठी ईटीएफची हालचाल तपासते. फक्त आर्थिक फायद्यासाठी केल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुंतवणुकीसाठी हे जास्त सुयोग्य आहे प्रत्यक्ष सोन्याच्या ताब्यासाठी नाही. गोल्ड फंडच्या गुंतवणुकीत ईटीएफप्रमाणे कुणालाही किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागत नाही. एसआयपीचे पर्याय 1000 रुपयांपासून सुरू होतात.