Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank RD vs Post office RD: 10 वर्षात गुंतवायचे आहेत 10 लाख; प्रत्येक महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?

Bank Deposit , Recurring Deposit, Investment ,

Bank RD vs Post office RD : सरकारी, खासगी, फायनान्स बॅंक्स तसेच टपाल कार्यालयांमध्ये रिकरींग डिपॉझिटची सोय असते. आरडीचा कार्यकाळ जितका जास्त असतो त्यानुसार गुंतवणूकदारांचा फायदा वाढतो. कोणत्या बँकेत किती व्याज मिळेल तसेच कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये आरडीची चांगली सूट आहे याची पुरेशी माहिती घेऊन गुंतवणूक करावी.

गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. अल्पबचतीच्या दृष्टीने बऱ्याच जणांना FD फिक्स डिपॉझिट किंवा RD रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायला आवडते. कमी जोखीम असल्याने अनेकजण एफडी किंवा आरडीमध्ये गुंतवणूक करतात. नियमित हप्ता ठेवून गुंतवणुकीच्या रकमेवर निश्चित व्याज दर दिली जाणारी आवर्ती ठेव (RD) ही एक लोकप्रिय बचत योजना आहे. RD चा कार्यकाळ संपल्यावर ग्राहकाला मॅच्युरिटी रक्कम मिळते. मुदत पूर्ण झाल्यावर गुंतवलेली रक्कम जमा व्याजासह वापरकर्त्याला परत दिली जाते.

सरकारी, खासगी, फायनान्स बॅंक्स तसेच टपाल कार्यालयांमध्ये रिकरींग डिपॉझिटची सोय असते. आरडीचा कार्यकाळ जितका जास्त असतो त्यानुसार गुंतवणूकदारांचा फायदा वाढतो. कोणत्या बँकेत किती व्याज मिळेल तसेच कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये आरडीची चांगली सूट आहे  याची पुरेशी माहिती घेऊन गुंतवणूक करावी.

पोस्ट ऑफिस आरडी (Post Office RD) 

  • पोस्ट ऑफिस अंतर्गत आरडी योजना मिळते. पोस्ट ऑफिसच्या आरडीची रचना मध्यम मुदतीची बचत योजना असते. 
  • या योजनेत ठेवीदारांना त्यांची गुंतवणूक किमान पाच वर्षे ठेवावी लागते.
  • पोस्ट ऑफिस आरडी ही मासिक निश्चित गुंतवणूक आहे.
  • पोस्ट ऑफिस खाते गुंतवणूकदारांना दरमहा रु 100 आणि रु 10 च्या पटीत गुंतवणूक करून देते. • हे खाते उघडण्यासाठी अल्पवयीन व्यक्तीचे नाव देखील वापरले जाऊ शकते.
  • या सुविधेत दोन प्रौढ व्यक्तीदेखील त्यांची एकापेक्षा जास्त संयुक्त खाती उघडू शकतात.
  • जर मासिक गुंतवणूक करणे शक्य झाले नाही तर तुमच्याकडून प्रत्येक 100 रुपयांसाठी 1 रुपया डीफॉल्ट शुल्क आकारले जाते.
  • RD मध्ये एक वर्षानंतर खात्यातील शिल्लक 50% पर्यंत अंशतः रक्कम काढण्याची परवानगी आहे.

बँक आरडी (Bank RD) 

  • बँकेत सुद्धा आरडीची सुविधा उपलब्ध असते. 
  • आरडी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करता येऊ शकते. 
  • किमान ठेव कालावधी 6 महिने आणि कमाल ठेव कालावधी 10 वर्षे इतका आहे.
  • बँक आरडी ठेवींवर कर्ज घेण्याचा पर्याय देखील आहे.
  • खातेदाराला ठेव रकमेच्या 80 ते 90% पर्यंत कर्ज दिले जाऊ शकते.
  • बँक आरडीचा मॅच्युरिटी कालावधी 1 ते 10 वर्षे इतका असतो.
  • बँक RD चा किमान कालावधी 6 महिन्यांपासून सुरू होतो.
  • हा कालावधी 10 वर्षांपर्यंत वाढवता येतो.

दर महिन्याला किती गुंतवणूक करावी हे ठरवले जाते

बँक RD वरील व्याज दर मुदत ठेव (FD) प्रमाणेच असून बचत खात्यापेक्षा जास्त आहे. प्रत्येक बँकेच्या ‘आरडी’वरील व्याज दरानुसार दर महिन्याला किती गुंतवणूक करावी हे ठरवले जाते.
IDFC First Bank च्या 6.50% इतक्या व्याज दर नियमांनुसार 10 लाखांची गुंतवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याला 6000 रुपये गुंतवावे लागतात. म्हणजेच, गुंतवणूकदाराला 10 वर्षात 2.95 लाख व्याज मिळू शकेल. SBI च्या 5.50% इतक्या व्याज दर नियमांनुसार दरमहा 6300 रुपये भरावे लागणार आहेत. पोस्ट ऑफिस मधील व्याजदर 5.8% नुसार प्रत्येक महिन्याला 6200 इतक्या रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. अशा रीतीने, पोस्ट ऑफिस आरडी आणि बँक आरडीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन सर्वोत्तम आरडी निवडण्याचा निर्णय गुंतवणूकदार घेऊ शकतात.