Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bangalore Metro Pillar Collapse: बंगळूरमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला आणि... पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी वाचा

Bangalore Metro Pillar Collapse

Image Source : www.thehindu.com

Bangalore Metro Pillar Collapse: प्रस्थापित नवीन मेट्रोच्या पिलरचे बांधकाम सुरु असताना तिथून जाणाऱ्या एका कुटुंबावर दुर्दैवाने अचानक एक पिलर कोसळला. या घटनेमध्ये महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला.

Bangalore Metro Pillar Collapse: कर्नाटकातील बेंगळुरूच्या नागावारा(Nagavara) भागात मंगळवारी(10 जानेवारी) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. प्रस्थापित नवीन मेट्रोच्या पिलरचे बांधकाम सुरु असताना तिथून जाणाऱ्या एका कुटुंबावर दुर्दैवाने अचानक एक पिलर कोसळला(Pillar Collapse). या घटनेमध्ये महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊयात.

काय घडलं त्या दिवशी? 

कर्नाटकातील बेंगळुरूच्या नागावारा(Nagavara) भागात सध्या मेट्रो फेज 2बी(Metro Phase 2B) च्या  विमानतळापर्यंतच्या ट्रॅक बांधणीचं काम सुरू आहे. या बांधकामात पिलरचे काँक्रिटीकरण करण्याचे काम चालू आहे. मंगळवारी(10 जानेवार) सकाळी 10.45 च्या सुमारास मेट्रोचे बांधकामातील जवळपास 40 फुटांचा आणि  कित्येक टन वजनाचा पिलर अचानक तिथून जात असलेल्या गाडीवर कोसळला. झालं असं की, लोहिथ कुमार(Lohith Kumar) त्यांची पत्नी तेजस्विनी(Tejaswini) आणि दोन मुलं यांच्यासह सकाळी घरातून ऑफिसला जात होते. ते मुलांना नर्सरीत सोडून लोहिथ कुमार आणि तेजस्विनी आपापल्या ऑफिसला जाणार होते. त्याच सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आणि लोहिथ यांना या घटनेत आपल्या पत्नी आणि मुलाला गमवावं लागलं. पिलर कोसळल्याने तेजस्विनी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या एका प्रसंगामुळे लोहिथ कुमार यांचं आयुष्याचं बदललं.

पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत

या घटनेनंतर सगळीकडेच याबद्दल हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. सोशल मीडियावर याबद्दल बोललं जाऊ लागलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(Karnataka CM. Basavaraj Bommai) यांनी पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केलं. हा प्रकार दुर्दैवी असून त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.