Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bajaj Finserv ची म्युच्युअल फंड व्यवसायात उडी; 7 नव्या फंड योजना लवकरच जाहीर करणार

Bajaj Finserv MF

Bajaj finserv AMC ही Bajaj Finserv ची उपकंपनी असून कंपनीचे मुख्यालय पुणे असेल. पुण्यामध्ये पहिल्यांदाच एखाद्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्यालय सुरू झाले आहे. भारतातील ही 43 वी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. पुढील 30 दिवसांत कंपनी गुंतवणुकीच्या विविध योजना आणणार आहे. तसेच सात New Fund Offer (NFO) कंपनी लवकरच जाहीर करणार आहे.

Bajaj Finserv Mutual Fund: बजाज फिनसर्व्हने म्युच्युअल फंड व्यवसायात उडी घेतली आहे. 6 जून ला (मंगळवार) कंपनीने आपल्या नव्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा (AMC) शुभारंभ केला. Bajaj Finserv Mutual Fund असे या नव्या AMC चे नाव असेल. भारतातील ही 43 वी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. पुढील 30 दिवसांत कंपनी गुंतवणुकीच्या विविध योजना आणणार आहे. तसेच सात New Fund Offer (NFO) कंपनी लवकरच जाहीर करणार आहे. 

पुण्यात प्रथमच अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्यालय

Bajaj finserv AMC ही Bajaj Finserv ची उपकंपनी असून कंपनीचे मुख्यालय पुणे असेल. पुण्यामध्ये पहिल्यांदाच एखाद्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्यालय सुरू झाले आहे. सर्वाधिक AMC मुख्यालये मुंबईत आहेत. काही नव्याने सुरू झालेल्या फंड कंपन्यांचे कार्यालये बंगळुरातही आहेत.

सात नव्या योजना लाँच करणार 

बजाज म्युच्युअल फंडला सेबीकडून नव्या योजना लाँच करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. लवकरच सात योजना (Bajaj Finserv AMC NFO) घेऊन कंपनी ग्राहकांसमोर येणार आहे. यापैकी 3 योजना डेट म्युच्युअल फंड  (लिक्विड फंड, ओव्हरनाइट फंड, मनी मार्केट फंड) च्या असतील. तर इतर तीन योजना इक्विटी (बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड, लार्ज अँड मिड कॅप फंड, फ्लेक्सी कॅप फंड) संबंधित असतील. arbitrage fund योजना सुरू करण्यासही कंपनीला परवानगी मिळाली आहे. 

देशातील आघाडीच्या 10 फंड कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न

भारताची म्युच्युअल फंड बाजारपेठ 40 ट्रिलियन डॉलरची आहे. 2021 पासून पाच नव्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या सुरू झाल्या आहेत. आयटीआय,  WhiteOak MF, NJ, Trust mutual funds आणि सॅमको MF या कंपन्या बाजारात नव्याने दाखल झाल्या आहेत. बजाज म्युच्युअल फंड इक्विटी आणि डेट फंड योजनांकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. देशातील प्रमुख 10 फंड हाऊसेसमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न बजाज MF चा असेल.

"डेटा आणि टेक्नॉलॉजीवर भर राहील" 

"भारतीय म्युच्युअल फंड मार्केटमध्ये काय करावे आणि काय करू नये, हे आम्हाला माहिती आहे. देशातील म्युच्युअल फंड व्यवसायाचा विस्तार वाढत आहे. इतर फंड हाऊसपेक्षा वेगळं काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे बजाज फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. विविध उद्योग, व्यवसायांशी आमची भागीदारी आहे. तसेच डेटा आणि टेक्नॉलॉजीच्या वापराने आम्ही नक्कीच पुढे जाऊ, असेही ते म्हणाले. 

सीइओ गणेश मोहन यांच्याबद्दल 

बजाज म्युच्युअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी गणेश मोहन यांची नेमणूक करण्यात आली आहे. (Bajaj Finserv AMC NFO) याआधी ते 8 वर्ष बजाज फिनसर्व्हमध्ये कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी हेड म्हणून काम पाहत होते. त्यापूर्वी त्यांनी बोस्टन कन्सल्टंसी (BCG) ग्रुपमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मार्च महिन्यात बजाज म्युच्युअल फंडला सेबीकडून मान्यता मिळाली होती. आता कंपनी मार्केटमध्ये उतरण्यास सज्ज झाली आहे. गुंतवणूकदारांचा बजाज फिनसर्व्हच्या योजनांना कसा प्रतिसाद मिळतो, ते येत्या काळात समजेल.