Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बादशाहच्या कॉन्सर्टमधील सर्वात महाग तिकीटाची किंमत ऐकून तुमचेही डोळे चमकतील

Badshah Live Concert Ticket Price

Image Source : www.virtualexpodubai.com

Badshah Concert Ticket Price: बादशाहच्या (Badshah) लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी आता लोकांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत ऐकल्यानंतर अनेकांचे डोळेच चकाकले आहेत.

Badshah Concert Ticket Price: बॉलिवूड प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी लोकप्रिय ठरला आहे. आज (24 डिसेंबर रोजी) मुंबईमधील वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये(National Sports Club of India) बादशाहच्या गाण्याचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. 'पागल' असे या कॉन्सर्टचे(Concert) नाव ठेवण्यात आले आहे. या कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत 999 रुपयांपासून सुरु होते. पण लोकांच्या तुफान प्रतिसादामुळे 999 रुपयांचे सर्व तिकीट विकले गेले आहेत.  या कॉन्सर्टचं सर्वात महाग तिकीट हे चक्क 6 लाख रुपयांचे आहे. त्यामुळे 'पागल' नावाच्या या कॉन्सर्टमधील बादशाहचा लाईव्ह परफॉर्मन्स(Live Performance) पाहण्यासाठी लोकांना आता लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. या तिकीटाची किंमत ऐकून अनेकांचे डोळेच चकाकले आहेत. सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी यावर तुफान मिम्स बनवले आहेत.

काय म्हणतायेत नेटकरी

6 लाख रुपये तिकीट हे ऐकल्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊसच पडायला सुरवात केली आहे. 'बादशाहच्या कॉन्सर्टचं सहा लाखचं तिकीट(Ticket Price 6 lac) खरेदी करण्यासाठी शेअर्स विकण्यासाठी आलो होते.' असं म्हणत एकाने ट्वीट केलं आहे.  

बादशहाचा प्रवास

आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे बादशाहचं खरंखूर नाव आहे. 2006 साली त्याने त्याच्या संगीत क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांकडून तुफान पसंती मिळाली आहे. बादशाह आणि  हनी सिंहने काही काळासाठी एकत्र काम देखील केले. मात्र त्यानंतर 2012 मध्ये दोघे वेगळे झाले. बादशाहने 'कर गई चुल' हे गाणं रिलीज केलं जे पुढे 'कपूर अँड सन्स' या चित्रपटात वापरलं गेलं. 2015 मध्ये आलेलं 'डीजे वाले बाबू' हे गाणं रिलीज झालं जे प्रचंड गाजलं. 2018 मध्ये, बादशाहने त्याचा पहिला अल्बम 'ओरिजिनल नेव्हर एंड्स' (O.N.E.) रिलीज केला होता.