विनाजोखीम गुंतवणूक (Investment) करण्याचा आणि खात्रीशीर परतावा (Good return) मिळवण्याचा उत्तम पर्याय म्हणून अनेकजण मुदत ठेवीत आपले पैसे गुंतवत असतात. दीर्घ कालावधीसाठीच्या गुंतवणुकीसाठी एफडीला पसंती असते. अॅक्सिस बँकेनं (Axis bank) आता आपल्या एफडीच्या (Fixed deposit) व्याजदरांमध्ये बदल केला आहे. सामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या व्याजदरांमधले हे बदल 26 जुलै 2023पासून लागू झाले आहेत. विविध कालावधीसाठी सामान्य दर हा 3.50 टक्क्यांपासून 7.10 टक्के इतका निश्चित करण्यात आला आहे.
Table of contents [Show]
संकेतस्थळावर सविस्तर माहिती
अॅक्सिस बँकेनं आपल्या संकेतस्थळावर यासंदर्भातली यादी दिली आहे. त्यात विविध कालावधीत किती व्याजदर असेल याचे डिटेल्स दिले आहेत. सामान्य नागरिक तसंच ज्येष्ठ नागरिक यांच्या 5 कोटी आणि त्याहून जास्त तर 5 कोटी आणि त्याहून कमी अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
अॅक्सिस बँकेनं जारी केलेले सामान्य ग्राहकांसाठीचे दर पाहू...
कालावधी - व्याजदर
- 7-45 दिवस - 3.50 टक्के
- 46-60 दिवस - 4 टक्के
- 61-90 दिवस- 4.50 टक्के
- 3-6 महिने - 4.75 टक्के
- 6-9 महिने - 5.75 टक्के
- 9-12 महिने - 6 टक्के
- 1 वर्ष ते 4 महिने - 6.75 टक्के
- 1 वर्ष 5 दिवस ते 13 महिने - 6.80 टक्के
- 13 महिने ते 2 वर्ष - 7.10
सात टक्क्यांपेक्षा जास्तीचं व्याज
बँकेनं 16 महिन्यांपासून पुढे 17 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 10 बीपीएस घट करून 7.20 टक्क्यांवरून 7.10 टक्के केलं आहे. 2 वर्ष ते 30 महिन्यांपर्यंतच्या जमा रकमेवर आता बँकेकडून 7.05 टक्के व्याज दिलं जाणार आहे. तर 30 महिन्यांपासून 20 वर्षांच्या दरम्यान मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवीवर 7 टक्के इतकं व्याज असणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना काय दर?
ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेनं लेटेस्ट इंटरेस्ट रेट जारी केले आहेत. सिनिअर सिटीझन्ससाठी आता 3.50 टक्के ते 7.85 टक्के इतकं दरवर्षी व्याज दिलं जाणार आहे. सामान्य ग्राहकांपेक्षा काही प्रमाणात अधिक व्याजदर बँकेनं ज्येष्ठ नागरिकांना देऊ केलं आहे.