Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smartphone Safety Tips: मोबाईल साफ करताना 'या' चूका अजिबात करू नका अन्यथा फोन खराब झालाच म्हणून समजा

Smartphone

Smartphone Safety Tips: आपण अजाणतेपणी मोबाईल साफ करताना अनेक चुका करतो, ज्यामुळे आपला फोन खराब होऊ शकतो. या चुका टाळण्यासाठी खालील लेख नक्की वाचा.

Smartphone Safety Tips: आजकाल आपण सगळेच स्मार्टफोन(Smartphone) वापरायला लागलो आहोत. कमीत कमी किमतीपासून ते अगदी लाखो रुपयांच्या किमतीचे मोबाईल हल्ली बाजारपेठेत उपलब्ध आहेत. आपण सगळेच आपल्या स्मार्टफोनची काळजी घेत असतो. बऱ्याच वेळा आपण आपला फोन साफ करताना अनेक गोष्टींचा वापर करतो. मात्र आपल्या अजाणतेपणी फोन साफ करताना झालेल्या अनेक चुका या फोन खराब होण्यासाठी कारणीभूत ठरू शकता. चला तर याबद्दल आज आपण जाणून घ्या आहोत.

स्मार्टफोन साफ करताना या चुका टाळा(Avoid these mistakes while cleaning your smartphone)

स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी अनेकजण घरगुती वस्तुंचा वापर करत असतात. बरेच जण तर कोणत्याही ओल्या कपड्याने डिस्प्ले आणि स्पिकर साफ करतात. मात्र त्यांची हीच पद्धत त्यांच्या मोबाईलला नुकसान पोहचवू शकते. त्यामुळे नेमकी मोबाईलची साफसफाई कशी करावी हा प्रश्न आपल्याला सऱ्हास पडतो. जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोनचा डिस्प्ले(smartphone display) साफ करायचा आहे तर घरात पडलेले कोणतेही कापड कृपया वापरू नका, त्यामुळे वॉटर क्लीनर(water cleaner) तुमच्या स्मार्टफोनमध्ये जाऊ शकते व ते त्याठिकाणीच गोठते. काही लोक स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी वॉटर बेस्ड क्लिनरचा(water-based cleaners) वापर करतात, मात्र तसे केल्याने सुद्धा स्मार्टफोन खराब होऊ शकतो.

या गोष्टीचा वापर करून फोन साफ करा(Clean the phone using these things)

तुमचा स्मार्टफोन डिस्प्ले(smartphone display) साफ करण्यासाठी तुम्ही नेहमी मायक्रो फायबर कापडाचा(Microfiber cloth)  वापर करा. हे कापड अतिशय मऊ असते, याशिवाय धुळीचे कणही चांगले शोषून घेण्यास मदत करते. याच्या वापरामुळे तुमच्या स्मार्टफोनला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.