• 07 Dec, 2022 09:46

Best Smartphone Under 15000 : फेस्टीव्हल ऑफर्समध्ये मिळवा बेस्ट स्मार्टफोन!

Best smartphone under 15000

Best smartphone under 15000 : अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र ते प्रत्येकाला घेणे शक्य नाही. 15000 रुपयांच्या आतील किमतीत आता उत्तम दर्जाचे मोबाईल तुम्ही खरेदी करू शकता.

Best smartphone under 15000 : कोरोनामुळे मागील दोन वर्ष सर्वत्र आर्थिक टंचाई निर्माण झाली होती. त्यात अनेकांचे रोजगारही गेले. त्यामुळे कमी पैशांत उत्तम प्रोडक्ट घेण्याकडे सगळ्यांचा कल आहे. स्मार्टफोनबद्दल बोलायचं झालं तर आता मूलभूत गरजांमध्ये मोबाईलही आवश्यक आहे. कमी खर्चात चांगली वस्तू म्हणजेच आता कमी किमतीत चांगला स्मार्टफोन (SmartPhone)

आता तुम्हाला मिळणार 15000 पेक्षा कमी किमतीचा तुम्हाला पाहिजे तसा स्मार्टफोन. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक उत्पादक चांगले कॅमेरे, वेगवान प्रोसेसर आणि चांगल्या बॅटरी देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहे. त्यातच आता आणखी भर म्हणजे त्याच मोबाईलची किंमत 15000 पेक्षा कमी असणार आहे. (A good quality smartphone at a low price)

[media url="https://www.youtube.com/watch?v=URS_UaZsb9A"][/media]


(Qualcomm Snapdragon)क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, जो काही महिन्यांपूर्वी 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत नव्हता. पण आता तो तुम्हाला 15 हजार रुपयांच्या आत मिळू शकतो. या सेगमेंटमध्ये (Qualcomm Snapdragon) क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 सह येणारे फोन MediaTek Helio P70 सारख्या प्रोसेसरसह खरेदी करू शकता. 

तसेच,  15000 रुपयाच्या आतील  सेगमेंटमध्ये, आता तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी  सेन्सर देखील मिळत आहे. तुम्हाला 15 हजार रुपयांमध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर असलेले अनेक स्मार्टफोन मिळतील. काही बेस्ट फीचर्स असलेले आणि कमी किमतीचे नवीन स्मार्टफोन (New & Low Price Smartphones) आपण पाहणार आहोत.

Budget Smartphone