Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Marry Now Pay Later FAQ: ईएमआय भरा आणि करा धुमधडाक्यात लग्न!

Marry Now Pay Later FAQ

Marry Now Pay Later FAQ: बाय नाऊ, पे लेटर हे तुम्ही ऐकले असेल किंवा त्याचा वापरदेखील केला असेल. पण तुम्हाला मॅरी नाऊ, पे लेटर याबाबत काही माहिती आहे का? सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला आहे आणि तुम्ही जर लग्नाचा विचार करत असाल तर Marry Now Pay Later बद्दल नक्की जाणून घ्या.

मॅरी नाऊ, पे लेटर (Marry Now, Pay Later)  या चार शब्दांमध्येच अर्थ दडला आहे. म्हणजे लग्न आता करा आणि पैसे नंतर भरा. लग्न करताना बऱ्याचवेळा मोठ्या खर्चाची तरतूद करावी लागते. काहीजणांना आयुष्यभराची कमाई लग्नासाठी खर्च करावी लागते. यातून काही प्रमाणात रिलिफ मिळण्यासाठी काही फिनटेक कंपन्यांनी मॅरी नाऊ, पे लेटर ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या कंपन्या लग्न करणाऱ्या उमेदवारांना लग्नातील काही खर्चासाठी कर्ज देतात. यामध्ये तुमच्या लग्नाचा हॉल, जेवणाची व्यवस्था पाहणारे कॅटरर, डेकोरेशन, फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी, त्याचबरोबर लग्नासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवरील खर्च यामध्ये समाविष्ट होतो. पण या मॅरी नाऊ, पे लेटर संकल्पनेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम आहे. त्याची उत्तरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.

'मॅरी नाऊ, पे लेटर'काय आहे?

'मॅरी नाऊ, पे लेटर' ही 'बाऊ नाऊ,पे लेटर' या संकल्पनेवर आधारित असलेली आणि लग्नासाठी लागणारा अगाऊ खर्च देणारी तरतूद आहे.  

'मॅरी नाऊ, पे लेटर'चा कोणत्या खर्चासाठी वापर होऊ शकतो?

तुमच्या कुटुंबात तुमचे स्वत:चे किंवा इतर एखाद्या सदस्याचे लग्न असेल. तर तुम्ही Marry Now, Pay Later याचा वापर करून लग्नाचा हॉल, कॅटरिंग, डेकोरेशन, फोटोग्राफी-व्हिडिओ, वेडिंग प्लॅनिंग आणि बऱ्याच गोष्टींसाठी लागणारा खर्च कर्जरूपात मिळवू शकता.

'मॅरी नाऊ, पे लेटर'मधून मिळणारे पैसे इतर कारणांसाठी वापरू शकतो का?

नाही, मॅरी नाऊ, पे लेटर चा वापर फक्त लग्नाशी संबंधित खर्चासाठी वापरता येतो. तो ही वर नमूद केलेल्या निवडक गोष्टीसाठी.

'मॅरी नाऊ, पे लेटर'साठी कोण अर्ज करू शकतो?

ज्याचे वय 23 वर्ष पूर्ण आहे आणि ज्याचा किमान पगार 18,000 रुपये आहे; तो या स्कीमसाठी अर्ज करू शकतो.

'मॅरी नाऊ, पे लेटर'कसे काम करते?

marrynowpaylater.in या वेबसाईटवर ऑनलाईन पडताळणी करता येते. यासाठी संबंधित उमेदवाराला 3 महिन्याचे बॅंक स्टेटमेंट, केवायसी डॉक्युमेंट अपलोड करावे लागते. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर नेमकी किती रक्कम मंजूर होऊ शकते, ते कळते.

'मॅरी नाऊ, पे लेटर' हे संपूर्ण भारतात लागू आहे?

होय, marrynowpaylater कंपनीतर्फे संपूर्ण भारतात 5 हजार पिनकोड पर्यंत ही सेवा दिली जाते.

किती रुपयांचे कर्ज मिळते आणि ईएमआयचा कालावधी किती असतो?

उमेदवाराच्या पात्रतेनुसार जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत कर्ज मिळते. तसेच ईएमआयची सुविधा 3 महिन्यांपासून 6, 9, 12, 15, 18 & 24 महिन्यांपर्यंत उपलब्ध आहे.

या योजनेसाठी प्रोसेसिंग फी किती आकारली जाते?

मंजूर झालेल्या एकूण रकमेवर 2.5 टक्के प्रोसेसिंग फी आकारते.

यासाठी व्याजदर काय आकारला जातो?

ग्राहकाच्या प्रोफाईलनुसार आणि मंजूर झालेल्या रकमेवर आधारित 20 ते 26 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारला जातो.

मुदतीपूर्वी रक्कम भरल्यास प्री-क्लोजिंग चार्जेस लागू आहेत का?

नाही, marrynowpaylater कंपनी प्री-क्लोजिंगसाठी काहीच चार्ज आकारत नाही.