भारतात जेव्हापासून ॲपलने आपले रिटेल स्टोअर सुरु केले आहे तेव्हापासून ॲपल कोणकोणत्या नव्या योजना घेऊन येणार आहे हे जाणून घेण्यासाठी आयफोन प्रेमी ग्राहक कमालीचे उत्सुक असतात. iPhone 15 च्या लॉन्चिंगवेळी भारतीयांची ॲपलच्या बाबतीतली क्रेझ आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेली असेल.
अशातच 30 ऑक्टोबर रोजी ॲपलने स्कअरी फास्ट इवेंटची (Scary Fast Event) घोषणा केली आहे. या इवेंटमध्ये जगभरातील ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन नवनवीन तंत्रज्ञान असलेले ॲपलची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंतची ॲपलची मार्केटिंग रणनीती लक्षात घेता Apple Scary Fast Event मध्ये अपडेटेड मॅकबुक प्रो आणि iMac चे लॉन्चिंग केले जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
It’s official! Apple will announce new products at the #AppleEvent on October 30th at 5 p.m. PDT! ?
— Apple Hub (@theapplehub) October 24, 2023
Are you excited? pic.twitter.com/17YyUPg210
जगभरात 30 ऑक्टोबर रोजी हा सेल सुरु होणार असला तरी भारतात मात्र या सेलमध्ये युजर्सला सहभागी व्हायचे असल्यास त्यांना 31 ऑक्टोबरला पहाटे 5:30 वाजल्यापासून खरेदी करता येणार आहे. तुम्हाला देखील ॲपलच्या या खास सेलमध्ये खरेदी करायची असेल तर 31 ऑक्टोबरच्या पहाटेपासून तुम्ही यात सामील होऊ शकता.
या इवेंटचे थेट प्रक्षेपण ग्राहकांना कंपनीने ऑनलाइन YouTube आणि Apple.com वर बघता येणार आहे. नव्या उत्पादनांचे स्पेसिफिकेशन, त्याची किंमत, फीचर्स आदी गोष्टी ग्राहकांना घरबसल्या बघता येणार आहेत. याशिवाय ji उत्पादने ग्राहकांना खरेदी करायची आहेत ती उत्पादने नजीकच्या ॲपल स्टोअर्समध्ये देखील उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
मॅक लॉन्चिंगची होऊ शकते घोषणा
ॲपल कंपनीकडून यंदाच्या सेलमध्ये नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असलेला मॅक iMac सादर केला जाऊ शकतो. गेल्या काही काळापासून कंपनी स्मार्टफोन आणि मॅकबुकवर लक्ष केंद्रित करत आहे. या उत्पादनांसाठी ग्राहक संख्या मोठी असली तरी iMac ची मागणी देखील कमी झालेली नाहीये.
ग्राहकांच्या गरजा आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन यंदा ॲपल धमाकेदार उत्पादने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.