Apple Headset : उच्च तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या दर्जाच्या बाबतीत मोठं नाव असलेली ॲपल कंपनी आता आपल्या ग्राहकांसाठी मिक्स्ड रिॲलिटी वर आधारित हेडसेट आणणार आहे. आयफोन (iPhone), आयपॅड (iPad) आणि आयवॉचनंतर कंपनी आता मार्केटमध्ये सुपर टेक्नोलॉजीचे हेडसेट लाँन्च करणार आहे. येत्या जून महिन्यांमध्ये कंपनीच्या वर्ल्डवाइल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये हे हेडसेट लाँन्च केले जाणार आहेत.
विशेष म्हणजे हे हेडसेट मिक्स्ड रिॲलिटी हेडसेट आहेत. म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटी फिल्म बघताना तुम्ही ते वापरू शकणार आहात. त्यामुळे या हेडसेटची किंमतही अशीच तगडी असणार आहे.
पाहुयात या हेडसेटचे वैशिष्ट्ये काय आहेत, किंमत तुम्हाला परवडणारी आहे की नाही आणि या कंपनीच्या वर्ल्डवाइल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये आणखी काय काय घडणार आहे.
मिक्स रिॲलिटी हेडसेट
ॲपल कंपनीचे मिक्स रिॲलिटी हेडसेट या प्रोडक्टवर गेल्या 7 वर्षापासून काम सुरू होतं. या प्रोजेक्टमध्ये जवळपास 1500 इंजिनियर कार्यरत होते असं हे प्रोडक्ट जून महिन्यापासून मार्केटमध्ये लाँन्च केलं जाणार आहे. या हेडसेटचं नाव रिॲलिटी प्रो असं ठेवलं जाणार आहे. व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) हे या हेडसेटचं मूळ तंत्रज्ञान असणार आहे. या वीआरच्या माध्यमातून गेमिंग, व्हर्च्युअल मिटिंग्ज, व्हर्च्युअल एक्सरसाईज अशा अनेक गोष्टींसाठी या फायदा होणार आहे. मात्र अशा या नाविन्यपूर्ण, इंटरेरस्टींग हेडसेटची किंमत आहे 3 हजार अमेरिकन डॉलर. आजच्या भारतीय चलनाच्या दरानुसार भारतात या हेडसेटची किंमत असेल 2 लाख 46 हजार 370 रूपये.
ॲपलची वर्ल्डवाइल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्स
येत्या जून महिन्यामध्ये कंपनीची वर्ल्डवाइल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्स आयोजित केली आहे. या कॉन्फरन्स मध्ये ॲपलच्या विविध प्रोडक्टच्या अपडेशनविषयी व आगामी प्रोडक्ट संदर्भात वैगेरे चर्चा केली जाते. यंदाच्या या कॉन्फरन्स मध्ये मिक्स रिॲलिटी हेडसेट या महागड्या डिव्हाईस लाँन्च केलं जाणार आहे. यासोबतच नवीन xrOS ओपरेटिंग सिस्टिम, सॉफ्टवेअर डेव्हलमेंट कीट, नवीन मॅकबुक्स, आयओएस 17, आयपॅडओएस 17, मॅकओएस 14 आणि वॉचओएस 10 हे नवीन सॉफ्टवेअर अपडेशन्ससुद्धा लाँन्च केले जाणार आहेत.