ॲपलचा नवाकोरा मोबाईल घ्यायचा विचार करताय? कुठली ‘पैसा बचावो’ स्कीमच्या शोधात आहात? तर मग थांबा, तुमच्यासाठी एक मोठी ऑफर आलीये. तुमच्या बजेटमध्ये बसणारी, खिशाला परवडणारी एक स्कीम ॲमेझॉनने आणली आहे. चला तर जाणून घेऊयात ॲमेझॉनची ही ऑफर नेमकी काय आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon तुम्हाला iPhone खरेदी करण्याची खास संधी देत आहे.ॲमेझॉनने Apple Sale Days on Amazon नावाने एक सेल सुरु केलाय. येत्या 17 जूनपर्यंत हा सेल सुरु असणार आहे हे लक्षात असू द्या. भारतात आयफोन युजर्स मोठ्या संख्येने आहेत, भारतीयांची आयफोनची पसंती लक्षात घेऊन आयफोनने भारतात स्टोअर देखील सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर ॲमेझॉनचा हा सेल आयफोन प्रेमींसाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे. ॲमेझॉनच्या Apple iPhone 14 सेरीजच्या मोबाईल खरेदीवर ग्राहकांना मोठ्या सवलती दिल्या जात आहेत.
iPhone 14 सेरीजवर खास ऑफर
Apple iPhone 14 सेरीजच्या iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max या मोबाईलवर सध्या मोठी सवलत दिली जात आहे. Apple iPhone 14 सेरीजच्या सर्व मॉडेल्सवर ग्राहकांना सवलत मिळणार आहे. ग्राहकांना 128GB Apple iPhone 14 मॉडेल फक्त 67,999 रुपयांमध्ये आता खरेदी करता येणार आहे. या फोनची मूळ किंमत 79,999 रुपये इतकी आहे. म्हणजेच या सेलमध्ये ग्राहकांना संपूर्ण 15% डिस्काउंटचा लाभ मिळणार आहे.
Apple Sale Days are live on Amazon. pic.twitter.com/l97H9D6smW
— Mukul Sharma (@stufflistings) June 13, 2023
यासोबतच iPhone 14 चा 256GB व्हेरिएंट 13 टक्के सवलतीच्या दरात 77,999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या फोनची मूळ किंमत 89,900 रुपये इतकी आहे. जर तुम्ही iPhone 14
512GB स्टोरेजचा व्हेरिएंट विकत घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यावर 11 टक्के डिस्काउंट मिळणार आहे.
iPhone 14 Plus च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर ग्राहकांना 14% सूट दिली जाणार आहे. याची मूळ किंमत 89,900 रुपये इतकी असून सवलतीत हा मोबाईल 76,999 रुपयांना ग्राहक खरेदी करू शकणार आहेत. तसेच iPhone 14 Pro Max वर ग्राहकांना 9 टक्के सूट मिळत आहे. याची मूळ किंमत 1,39,900 रुपये इतकी असून हा मोबाईल सवलतींच्या दरात 1,27,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच 256GB व्हेरिएंटचा 1,39,900 रुपये किमतीचा मोबाईल ग्राहकांना 1,34,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
HDFC बँकेचे डेबिट कार्ड वापरून जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हाला 3000 रुपयांचा अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. तसेच HSBC क्रेडिट कार्डाने पेमेंट केल्यास 250 रुपयांचा क्रेडिट कार्ड कॅशबॅक ग्राहकांना मिळवता येणार आहे.
मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांना EMI चा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. जर तुम्ही सुद्धा या ऑफरचा लाभ घ्यायचा विचार करत असाल तर ही ऑफर येत्या 17 जूनला संपते आहे हे लक्षात असू द्या.