Apple BKC store : भारतातलं पहिलं अॅपल स्टोअर हे आर्थिक राजधानी मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजे (BKC) मध्ये सुरू होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये 18 एप्रिलपासून हे स्टोअर सुरू होत आहे.
भारतामध्ये अॅपल आयफोन्सच्या उत्पादन निर्णयानंतर आता सुरू होत असलेल्या पहिल्या स्टोअर विषयी बाजारामध्ये चर्चा रंगत आहेत. मात्र, यावेळेस जाबारामध्ये चर्चा सुरू आहे ती अॅपल कंपनीने करारामध्ये घातलेल्या काही विशेष अटींची. पाहुयात काय आहेत या अटी.
अॅपलने 22 प्रतिस्पर्धी कंपन्यावर घातली बंदी
अॅपलने जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आपलं पहिलं स्टोअर सुरू करत आहे. यासंदर्भात रिलायन्स ग्रुपसोबत केलेल्या करारामध्ये अॅपलची एक अट अशी आहे की, अॅपलचे प्रसिस्पर्धी कंपन्या या जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आपलं आउटलेट सुरू करू शकत नाही. यामध्ये अॅपलने एकुण 22 कंपन्यांची नावं समाविष्ट केली आहेत. आयटी आणि इ-कॉमर्स क्षेत्रातल्या या कंपन्या आहेत.
या प्रतिस्पर्धी कंपन्यामध्ये अॅमेझॉन, फेसबुक, गूगल, एलजी, मायक्रोसॉफ्ट, सोनी, ट्विटर, बोस, डेल, डेविलेट, फॉक्सकॉन, जर्मीन, हिताची (Hitachi), एचपी, एचटीसी, आयबीएम, इंटेल, लिनोवो, नेस्ट, पॅनासॉनिक आणि तोशिबा यांचा समावेश आहे. 22 वी कंपनी कोणती हे असून समोर आलेलं नाहीये.
अॅपलच्या या अटीनुसार वर उल्लेख केलेल्या कंपन्या या जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आपलं स्टोअर सुरू करू शकत नाही. तसेच या मॉलमध्ये कोणत्याचं प्रकारची जाहिरात, ब्रँडिंग सुद्धा करू शकत नाही. या अंतर्गत रिलायन्स ग्रुपला या प्रॉपर्टीमध्ये अॅपल कंपनीने नमुद केलेल्या कंपनीला कोणत्याही प्रकारचे परवाने, उप-परवाने, भाडेतत्वासंबंधित करार करता येणार नाहीत.
असे करार कायदेशीर की बेकायदेशीर
अॅपल आणि रिलायन्स ग्रुपच्या या करारातील या अटीविषयी खूप चर्चा सुरू आहे. अशी अट घालणे योग्य की अयोग्य हा या चर्चतील मुख्य विषय आहे. मुळात अशी अट घालण्यात कायदेशीर रीत्या काही चुकीचे नाही. अनेक कंपन्यांकडून जमीनमालकांसोबत अशा प्रकारचे करार केले जातात. जमीनमालकसुद्धा सहज या अटी मान्य करत असतात.
अॅपल आणि रिलायन्स ग्रुपमधील करारातील इतर गोष्टी
अॅपलने जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमधल्या या स्टोअरसाठी रिलायन्स ग्रुपसोबत 11 वर्षाचा करार केला आहे. अॅपलकडून महिन्याला 42 लाख रूपये भाडे आकारले जाणार आहे. दर तीन वर्षांनी या भाड्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तसेच कंपनीला पहिल्या तीन वर्षामध्ये 2 टक्के आणि नंतर 2.5 प्रमाणे एकुण एकिण उत्पन्नांतील वाटा (Revenue Share) मिळणार आहे.