आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून अमूलने दुधाच्या दरात वाढ केल्याची घोषणा केली आहे. अमूलने दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. अमूलचे गाय व म्हशीचे दूध 2 रुपयांनी महाग झाले आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे.
वृत्तानुसार, दूधाचा नवीन दर आजपासून लागू होणार आहे. आता नवीन किमतींनुसार अमूल गोल्ड 64 रुपये, अमूल शक्ती 58 रुपये आणि अमूल फ्रेश 52 रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल. यासोबतच म्हशीच्या दुधाच्या दरात एक लिटरला चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता अर्धा लिटरचा दूध 34 रुपये दराने विक्री केली जाईल.
सहा महिन्यांत अमूलने दुसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार असून या दरवाढीमुळे आता आर्थिक गणित बिघडणार आहे. गायीच्या व म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमलू टी स्पेशल दूधाचा अर्धा लिटरचा भाव 29 रुपयांऐवजी 30 रुपये इतका वाढला आहे.अमूल डीटीएम स्लिम आणि ट्रिम दुधाची किंमत अर्धा लिटरसाठी 22 रुपयांवरून 23 रुपये करण्यात आली आहे.
दुधाचे भाव का वाढले?
गुजरातमध्ये अमूल दुधाच्या दरात झालेल्या वाढीमागे गेल्या काही महिन्यांत दुधाच्या उत्पादनात आणि किमतीत वाढ झाल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे. काही महिन्यांपासून पाळीव जनावरांच्या खाद्य व चाऱ्याच्या दरात 13 ते 14% वाढ झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी आवश्यक वस्तूंच्या महागाईत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यानंतर आता कंपनीने राज्यातील दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमूलने गेल्या काही महिन्यांत अनेकवेळा दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. अमूल कंपनीच्या म्हणण्यानुसार, किमतीतील सुधारणा त्यांच्या दूध उत्पादकांना दर टिकवून ठेवण्यास मदत करेल आणि आगामी उन्हाळी हंगामात अधिक दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहित करेल, हिवाळ्यात राज्यातील दूध उत्पादन कमी झाले होते.