Amazon closing AmazonSmile: मल्टीनॅशनल कंपनी आणि भारतातील घराघरातले दुकाने अॅमेझॉन कंपनीला सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदीच्या झळा बसत आहेत. त्यामुळे कंपनीने तब्बल तीनवेळ कर्मचारी कपात केली, तसेच काही सेवांची पद्धत बदलली तर काही सेवांचे फीचर्स बंद करून टाकले आहेत. त्यातच कंपनी आता त्यांचा सामाजिक उपक्रम अॅमेझॉन स्माईल येत्या 20 फेब्रुवारीपासून बंद करत आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज मानली जाणाऱ्या अॅमेझॉनने या वर्षाच्या सुरुवातीलाच आपली सामाजिक उपक्रम एक सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. अॅमेझॉनने नुकतेच जाहीर केले की कंपनीला अपेक्षित असलेला प्रभाव निर्माण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, हा चॅरीटी डोनेशन देण्याचा सामाजिक उपक्रम, अॅमेझॉन स्माईल (AmazonSmile) बंद करण्यात येणार आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत अॅमेझॉन स्माईल बंद करण्याची कंपनीची योजना आहे.
अॅमेझॉनने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या ग्राहकांना नोटीसमध्ये म्हटले आहे की 2013 मध्ये, आम्ही ग्राहकांना त्यांच्या आवडत्या सामाजिक संस्थांना समर्थन देण्यासाठी अॅमेझॉन स्माईल लाँच केले होते. तथापि, जवळजवळ एक दशकानंतरही या कार्यक्रमाने आम्हाला अपेक्षित असलेला प्रभाव निर्माण केला नाही. जगभरातील 1 लाखाहून अधिक संस्थांच्या बाबतीत, प्रभाव पाडण्याची आमची क्षमता बर्याचदा फारच कमी पडली असे दिसून आले आहे. अॅमेझॉन स्माईल बंद झाल्यानंतर, धर्मादाय संस्था त्यांच्या स्वत:च्या विशलिस्ट तयार करून अॅमेझॉन ग्राहकांकडून समर्थन प्राप्त करू शकणार आहेत
अॅमेझॉनचे कंपनीचे पुढचे पाऊल (Amazon's next move)
भविष्यात अॅमेझॉन नवे उपक्रम आणेल, इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करेल जिथे अर्थपूर्ण फरक पडता येईल, अशा गुंतवणुकीला प्राधान्य देणार आहे. यामध्ये परवडणारी घरे तयार करण्यापासून ते वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान शिक्षणापर्यंत पोहोचणे आणि बरेच काही समाविष्ट आहे, असे कंपनीने जाहिर पत्रात म्हटले आहे.
मागील वर्षाच्या सुरुवातीला अॅमेझॉनने आपली शैक्षणिक सेवा अॅमेझॉन अकॅडमी (Amazon Academy), अन्न वितरण आणि वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, अॅमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना ताज्या लेऑफमुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना सूचित करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. या विशिष्ट फेरीत किती कर्मचार्यांवर परिणाम होत आहे हे स्पष्ट नसले तरी, कंपनीने आधीच वॉशिंग्टनमधील 2 हजार 300 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले होते, त्यापैकी बहुतेकांनी सिएटलमध्ये काम केले होते, जिथे कंपनीचे एक मुख्यालय आहे.