ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने (Amazon) त्यांच्या ग्राहकांना एक महत्वाची सूचना दिली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार येत्या 19 सप्टेंबरपासून कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on Delivery) घेताना 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही जर कॅश ऑन डिलिव्हरीत दोन हजारांच्या नोटा देऊन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आताच सावध व्हा!
रिझर्व बँक ऑफ इंडियाने मे 2023 मध्ये दोन हजारांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने दिलेल्या सूचनेनुसार 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2 हजारांच्या नोटा बँकेत बदलून घेता येणार आहेत किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करून घेता येणार आहेत.
आरबीआयने सांगितल्यानुसार 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होतील मात्र ‘चलन’ म्हणून या नोटांची मान्यता कायम राहणार आहे. यंदा नोटबंदी करताना ग्राहकांना आरबीआयने पुरेसा वेळ दिला आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्या सवडीनुसार बँकांमध्ये जाऊन 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेत आहेत किंवा खात्यात जमा करत आहेत.
ॲमेझॉनचे निवेदन
2 हजारांच्या नोटा बँकेमधून बदलून घेण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्यामुळे देशभरातील ग्राहकांसाठी ॲमेझॉन इंडियाने ही माहिती प्रसारित केली आहे. सध्या या नोटांचा स्वीकार केला जात असून, 19 सप्टेंबरपासून 2 हजारांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे ॲमेझॉनने म्हटले आहे.
No ₹2000 notes for Amazon!?
— Benzinga India ?? (@BenzingaIndia) September 14, 2023
Amazon is making a significant change for its Indian customers, announcing that it will no longer accept ₹2000 notes for Cash on Delivery (COD) services starting September 19, 2023.
However, third-party couriers may still accept these notes… pic.twitter.com/HhHgYO4MPv
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन हजारांच्या जवळपास 93 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. आता केवळ 7% नोटा चलनात आहेत. आतापर्यंत देशभरातील विविध बँकांमध्ये जमा झालेल्या नोटांचे मूल्य 3.56 लाख कोटी रुपये असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
30 सप्टेंबरनंतर नोटांचे काय होणार?
2 हजारांच्या नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख आरबीआयने 30 सप्टेंबर अशी ठरवली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार केवळ 7% नोटाच चलनात अजूनही कायम आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा केल्या जाऊ शकतात. मात्र जे नागरिक 30 सप्टेंबरपर्यंत नोटा जमा करू शकणार नाहीत त्यांच्या पैशांचे काय होणार हे आरबीआयने अजूनही स्पष्ट केलेले नाहीये. त्यामुळे आरबीआयच्या पुढील निवेदनाची वाट बघावी लागणार आहे.