Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon one: हात दाखवा अन् पेमेंट करा, कार्डची गरजच नाही! 'अ‍ॅमेझॉन'ची अफलातून सर्व्हिस

Amazon one: हात दाखवा अन् पेमेंट करा, कार्डची गरजच नाही! 'अ‍ॅमेझॉन'ची अफलातून सर्व्हिस

Image Source : timesofindia.indiatimes.com

Amazon one: पेमेंटच्या विविध पर्यायांचा वापर आपण दररोज करत असतो. त्यात सध्या सर्वात जास्त वापरला जाणारा पर्याय म्हणजे यूपीआय. याशिवाय इतरही अनेक पर्याय आहेत. मात्र त्यातही सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे आणि हा पर्याय आणला आहे अ‍ॅमेझॉननं...

पेमेंट (Payment) करण्याच्या पद्धतीत झपाट्यानं बदल होताना दिसून येत आहे. मागच्या काही वर्षांचा आढावा घेतला तर हे स्पष्ट होईल. यूपीआय पेमेंट (Unified Payments Interface) सध्या सर्वात जास्त पसंतीचं आहे. त्यानंतर ऑनलाइन बँकिंग, क्रेडिट कार्ड तसंच डेबिट कार्डच्या माध्यमातून होणारं पेमेंट आणि शेवटी कॅश पेमेंट. या सर्व प्रकारांत आणखी सोपं असणारं पेमेंट दाखल झालं आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे दैनंदिन गोष्टी किती सोप्या होत आहेत, याचं हे उदाहरण आहे.

काय आहे अ‍ॅमेझॉन वन?

अ‍ॅमेझॉन वनच्या आधारे तुम्ही तुमचा हात दाखवला (Palm payment) तरी पेमेंट होणार आहे. ज्याप्रमाणे हातांचे ठसे घेतले जातात, त्याचप्रमाणे या पेमेंटची कार्यपद्धती आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या मेंबरसाठी खरं तर ही सुविधा आधीपासूनच उपलब्ध होती. मात्र आता Whole food storeवर याची सुरुवात करण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनमार्फत इतर ठिकाणीदेखील याची सुरुवात केली जाणार आहे.  

प्राइम मेंबर्ससाठी खास ऑफर

अ‍ॅमेझॉन प्राइमचे तुम्ही मेंबर असाल तर अशाप्रकारे पेमेंट करून तुम्ही डिस्काउंट अथवा विविध ऑफर्सही मिळवू शकता. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. अ‍ॅमेझॉन वन केआस (Amazon one kiosk) याठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डला टर्मिनलमध्ये ठेवावं लागेल. त्यानंतर रिडरवर तुमचे हात फिरवावे लागतील. त्यानंतर तुमचा संपर्क क्रमांक टाकावा लागेल. हे सर्व केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल.

हातांच्या ठश्याप्रमाणेच प्रभावी

कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी तुमच्या हाताचे ठसे घेतले जातात. जेणेकरून त्याचं क्लोनिंग होणार नाही आणि पर्यायानं तुम्ही फसवणुकीपासून वाचाल. या आपल्या ठश्यांप्रमाणेच हातदेखील यूनिक असतात, ज्याचं क्लोनिंग सहजासहजी होत नाही. प्रत्येकाचे फिंगरप्रिंट ज्याप्रमाणे वेगळे असतात, त्याचप्रमाणे हातदेखील... त्यामुळे फसवणुकीपासून वाचवेल, असा नवा पेमेंटचा ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.