• 05 Feb, 2023 13:37

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Plane Cargo: विमानाद्वारे मालवाहतूक व्यवसायात अॅमेझॉनची लवकरच एंट्री

Amazon Plane Cargo

अॅमेझॉन कंपनी भारतामध्ये लवकरच एअर कार्गो क्षेत्रात उतरणार आहे. देशभरात कंपनी विमानाद्वारे मालवाहतूक करेल. भारत ही मोठी बाजारपेठ असून या व्यवसायामध्ये भविष्यात मोठी संधी असल्याने कंपनीने या क्षेत्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Amazon Plane Cargo: अॅमेझॉन कंपनी भारतामध्ये लवकरच एअर कार्गो क्षेत्रात उतरणार आहे. देशभरात कंपनी विमानाद्वारे मालवाहतूक करेल. भारत ही मोठी बाजारपेठ असून या व्यवसायामध्ये भविष्यात मोठी संधी असल्याने कंपनीने या क्षेत्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कंपन्यांची छोटी मोठी पॅकेजेस आणि मालाची प्रामुख्याने विमानाद्वारे भारतभर करण्यात येईल. ऑनलाइन कॉमर्स व्यवसायात कंपनीने भारतामध्ये आधीच ठसा उमटवला असून इतर व्यवसायाच्या संधी कंपनीकडून शोधण्यात येत आहे.

कंत्राटी पद्धतीने चालणार काम

अॅमेझॉन एअर कार्गो क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर या क्षेत्रामधील आधीपासून ज्या कंपन्या काम करत आहेत, त्यांच्यापुढे स्पर्धा निर्माण होऊ शकते. तसेच भविष्यात इतरही बड्या कंपन्या एअर कोर्गो लवकरच सुरु करू शकतात. अॅमेझॉनद्वारे ही सुविधा चालवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने दुसऱ्या कंपन्यांना काम देण्यात येणार आहे.

अॅमेझॉन प्राइम एअर (Amazon Prime Air)

कंपनीने एअर कार्गो सुविधेचे नाव प्राइम एअर असे ठेवले आहे. पुढील महिन्यापासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. बंगळुरुतील कार्गो वाहतूक क्षेत्रातील क्विक जेट (QuikJet) कंपनीला याबाबतचे कंत्राट अॅमेझॉन कंपनीने दिले आहे. पुरवठा साखळी क्षेत्रातील कंपनी AFL आणि आर्यलँड येथील ASL Aviation Group यांच्यासोबत क्विक जेट कंपनी मिळून काम करते. 

बोइंग विमानाचा माल वाहतुकीसाठी वापर

विमानाने मालवाहतूक करण्यासाठी ताफ्यामध्ये Boeing 737-800 हे विमानही असणार आहे. या विमानातून सुमारे 24 टन मालवाहून नेण्याची क्षमता आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत अशी सहा विमाने ताफ्यात समाविष्ट करण्याचे अॅमेझॉनचे प्रयत्न आहेत.  युरोप आणि अमेरिकेबाहेर एखाद्या देशात एअर कोर्गो अॅमेझॉन पहिल्यांदाच लाँच करत आहे. अॅमेझॉनने 2016 साली अमेरिकेमध्ये एअर कोर्गो सुविधा सुरु केली होती. अॅमेझॉनच्या गोदामातून मालाची ने-आण करण्यासाठी विमानांचा वापर करण्यात येतो. आत्तापर्यंत अॅमेझॉनच्या जागतिक एअर कार्गो सुविधेमध्ये 91 विमाने आहेत.