Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon to shut down food delivery business in India: ॲमेझॉनची 'फूड डिलिव्हरी' बंद , आणखी दोन सेवांचा गाशा गुंडाळला

Amazon India, Amazon Food Delivery Business Shut, Amazon Academy

Amazon India to Shut Food Delivery Business: ॲमेझॉन पुढील महिन्यापासून भारतातील आपला फूड डिलिव्हरी व्यवसाय बंद करणार आहे. सुमारे अडीच वर्षापूर्वीच ॲमेझॉनने भारतात हा व्यवसाय सुरू केला होता. त्याशिवाय कंपनीने एज्युकेशन आणि डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस देखील बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

ॲमेझॉन इंडिया भारतातील तीन व्यावयासिक सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने पुढील महिन्यापासून भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर ॲमेझॉन एज्युकेशन आणि ॲमेझॉन डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस देखील बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. (Amazon has decided to shut its distribution services in India after Closing its Food Delivery and Education Service)

अडीच वर्षापूर्वी ॲमेझॉनने भारतात फूड डिलिव्हरी सुरु केली होती. ॲमेझॉनने आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना या निर्णयाविषयी माहिती दिली आहे. 29 डिसेंबरपासून फूड डिलिव्हरी बंद हाईल मात्र याचा भागीदारासोबतच्या व्यवहारावर परिणाम होणार नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनी पेमेंट आणि ऑर्डरशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करेल. सर्व देयके आणि इतर कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. यानुसार, ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व ॲमेझॉन टूल्स आणि रिपोर्ट्समध्ये रेस्टॉरंटना access असेल. यामध्ये कुठली  अडचण आली  तरी  ३१ मार्चपर्यंत  आवश्यक ते सर्व सहकार्य त्यांना केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Amazon India food delivery business ला मे २०२० पासून सुरुवात झाली होती. सुरुवातीला  बेंगळुरूमध्ये या व्यवसायाची ॲमेझॉनने सुरुवात केली होती. यानंतर आपल्या सेवेची व्याप्ती वाढवत  ही सेवा अन्य शहरातही सुरू केली होती. तुमच्या भागात ही सेवा सुरू असेल तर आता  29 डिसेंबरनंतर ॲमेझॉन फूडद्वारे ऑर्डर देता येणार नाही. आपल्या ग्राहकांचा  तसेच भागीदारांचा विचार करून टप्प्याटप्प्याने ही सेवा बंद करणार असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Amazon Academy ची सेवा बंद

दरम्यान, कंपनीने शैक्षणिक सेवा देणारे व्यासपीठ देखील गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना टाळेबंदीमध्ये कंपनीने ed-tech service, Amazon Academy हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म सुरु केला होता. BYJU's, Unacademy, Vedantu या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी Amazon Academy सुरु करण्यात आली होती. मात्र आता हा उपक्रम देखील बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्याशिवाय कर्नाटकात प्रामुख्याने सुरु असलेली डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस बंद करण्याची शक्यता आहे. बंगळुरु, हुबळी आणि म्हैसरु या शहरांत  Amazon ची डिस्ट्रिब्युशन सर्व्हिस सुरु आहे. या विभागात 50 हून अधिक कर्मचारी आहे. 

झोमॅटो, स्विगी यांच्या स्पर्धेपुढे निभाव नाही लागला

ॲमेझॉनच्या या सेवेला मे 2020 मध्ये बंगळुरुतून सुरुवात झाली. ॲमेझॉनची गुंतवणूक क्षमता मोठी होती. मात्र देशातील मोठ्या शहरात झोमॅटो प्रचंड सक्रिय आहे. फूड बिझनेसमधील बाजारपेठेत झोमॅटोचा मोठा हिस्सा आहे. स्वीगीचाही मोठा ग्राहकवर्ग आहे. याचा परिणामही ॲमेझॉनच्या व्यवसायावर झाला. ॲमेझॉनला या दोन कंपन्यांशी स्पर्धा करणे अवघड बनले. त्यामुळे फूड डिलिव्हरी सेवेतून माघार घेण्याचा निर्णय ॲमेझॉनने घेतल्याचे बोलले जाते. ॲमेझॉन फूड डिलिव्हीरीतून बाहेर पडत असल्याने झोमॅटो, स्विगीला फायदा होणार आहे. ॲमेझॉनचा ग्राहकवर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडून विशेष प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. 

हजारो कर्मचारी बेरोजगार होणार

फूड डिलिव्हरी हे उत्पन्नाचे एक आकर्षक साधन म्हणून गेल्या काही वर्षात पुढे आले आहे.  यातून खूप जणांना पूर्ण वेळ रोजगार उपलब्ध झाला आहे. बरेच जण पार्ट टाइम इन्कम सोर्स म्हणून देखील फूड डिलिव्हरी करत असतात. मात्र आता Amazon India food delivery business बंद होत असल्याचे या कंपनीत  हे काम करणाऱ्यांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे. यापूर्वी कंपनीने  10,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचे संकेच दिले होते. अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 3 टक्के कपात होऊ शकेल. यात भारतातील ही संख्या किती असेल याविषयी निश्चित अंदाज नसला तरी हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.